लता मंगेशकरांच्या प्रकृतीत सुधारणा, आयसीयूमध्ये उपचार सुरू; लवकर ब-या होण्यासाठी प्रार्थना करा

लता मंगेशकर यांच्या जवळच्या व्यक्ती अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी सांगितले, की त्यांच्या तब्येतील चांगली सुधारणा झाली असून काळजी करण्याचं काहीचं कारण नाही.

लता मंगेशकरांच्या प्रकृतीत सुधारणा, आयसीयूमध्ये उपचार सुरू; लवकर ब-या होण्यासाठी प्रार्थना करा
भारताच्या गाणकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 12:20 PM

मुंबई – भारताच्या गाणकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) या काही दिवसांपासून मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णलयात (Mumbai’s Breach Candy Hospital) उपचार घेत आहेत. ८ जानेवारी रोजी त्यांना कोरोना (corona) झाल्याचं निदान झाल्यानंतर तातडीने रूग्णालयात दाखल करण्याच आलं होतं. मागील 16 दिवसांपासून त्या ब्रीच कॅन्डी रुग्णलयाच्या आयसीयूमध्ये (ICU) उपचार घेत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मागच्या दोन दिवसांपासून त्यांनी ठोस अन्न खायला सुरूवात केल्याने त्यांच्या प्रकृतीत अधिक सुधारणा झाली आहे. त्या लवकर ठीक व्हाव्यात यासाठी चाहत्यांनी प्रार्थना करावी असं डॉक्टर डॉक्टर प्रतित समदानी (Dr Pratit Samdani) यांनी सांगितलं आहे. मागच्या काही दिवसात काही समाजकंटकांनी सोशल मीडियावर अफवा पसरवली होती. ती खोटी असून लता मंगेशकर लवकर ब-या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करा.

तब्येतील चांगली सुधारणा

लता मंगेशकर यांच्या जवळच्या व्यक्ती अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी सांगितले, की त्यांच्या तब्येतील चांगली सुधारणा झाली असून काळजी करण्याचं काहीचं कारण नाही. तसेच त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. त्या लवकर ब-या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करा.

डॉक्टर म्हणतात प्रार्थना करा

उपचारासाठी त्या रूग्णालयात दाखल झाल्या होत्या, त्या दरम्यान त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले. 8 तारखेपासून कोरोनावरती उपचार घेत आहेत. त्या कोरोनातून बाहेर आल्या आहेत. लता मंगेशकरांना 24 तास डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्याबाबत काही अफवा पसरल्या होत्या, पण त्या खोट्या असल्याच्या त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितले. तसेच त्यांच्या प्रकृतीत आता चांगली सुधारणा झाली असून आयसीयू उपचार घेत आहेत. “काल पासून त्यांच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा झाली असून त्या लवकर ब-या व्हाव्यात यासाठी लोकांनी पार्थना करा असं उपचार करणारे डॉक्टर प्रतित समदानी यांनी चाहत्यांना आवाहन केले आहे.

45 Years Of Khoon Pasina : मांडीवर वाघ अन् मनात आठवणींचा खजिना, अमिताभ बच्चन यांनी शेअर केला 45 वर्ष जुना फोटो

प्रियंका चोप्राचं मूल प्री मॅच्युअर! बाळाचं वजन वाढेपर्यंत चिंता कायम, कुठे सुरु आहेत उपचार?

Mayara Vaikul Birthday :’क्युट गर्ल’ मायराचा वाढदिवस, सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.