राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीच्या भावना, ‘परदेशात आहेत पण लगेच घरी…’

Raju Srivastav Death Anniversary: 'परदेशात आहेत पण लगेच घरी...', राजू श्रीवास्तव यांच्या निधनााच्या 2 वर्षांनंतर पत्नीने भावना केल्या व्यक्त, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिखा श्रीवास्तव यांनी व्यक्त केलेल्या भावनांची चर्चा

राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीच्या भावना, 'परदेशात आहेत पण लगेच घरी...'
Follow us
| Updated on: Sep 22, 2024 | 2:25 PM

आपल्या विनोदबुद्धीने सर्वांना हसवणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. राजू श्रीवास्तव यांच्या निधनला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. पण आजही चाहते त्यांना विसरु शकलेले नाही. आपल्या कॉमिक टायमिंगने त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केलं. निधनला दोन वर्ष झाल्यानंतर पत्नी शिखा श्रीवास्तव यांनी मनातील भावना व्यक्त केल्या आहे. राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं आहे… ही सत्य घटना आजही स्वीकारू शकत नाही… असं त्यांच्या पत्नी म्हणाल्या.

राजू श्रीवास्तव यांच्या निधनाबद्दल सांगायचं झालं तर, 21 सप्टेंबर 2022 मध्ये त्यांचे निधन झालं. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नुकताच झालेल्या मुलाखतीत शिखा श्रीवास्तव म्हणाल्या, ‘माझ्या आयुष्यात काहीही पूर्वीप्रमाणे राहिलेलं नाही. काय सुरु आहे मला काहीही कळत नाही.’

‘पूर्वी ते (राजू श्रीवास्तव) शोसाठी जायचे तेव्हा आम्ही त्यांची वाट पाहत बसायचो. पण आता विचार करतो की, ते शोसाठी बाहेर गेले आहेत. परदेशात गेले आहेत पण घरी येतील… असं म्हणत आम्ही स्वतःची समज घालत असतो.’ असं राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी म्हणाल्या. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘मैंने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपया’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम करत राजू यांनी अभिनय विश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलं. 2005 मध्ये त्यांनी स्टँड अप कॉमेडिय म्हणून सुरुवात केली आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण त्यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. तर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

राजू श्रीवास्तव यांचं निधन

राजू श्रीवास्तव यांचं 21 सप्टेंबर 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ट्रेडमिलवर पडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. सुमारे महिनाभर आयसीयूमध्ये राहिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. आजही त्यांना कोणी विसरु शकलेलं नाही. सोशल मीडियावर आजही राजू श्रीवास्तव यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप.
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका.
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?.
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?.
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली.
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल.
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा.
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?.
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा.