लॉरेन्स बिश्नोई याच्या भावाने केला ‘तो’ अत्यंत मोठा खुलासा, म्हणाला, सलमान खान..
अभिनेता सलमान खान याला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. सलमान खान हा अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याच्या मुंबईतील घरावर गोळीबार करण्यात आल्याची हैराण करणारी घटना घडलीये.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. सलमान खान हा अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे. मात्र, सलमान खान याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये. सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. लॉरेन्स बिश्नोई याच्या गँगकडून या धमक्या मिळत आहेत. एनसीपीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आलीये. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून ही हत्या करण्यात आलीये. सलमान खान आणि बाबा सिद्दीकी खूप जास्त चांगले मित्र होते. सलमान खानला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची बातमी कळताच त्याने लीलावती रूग्णालय गाठले. ज्यावेळी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला, त्यावेळी सलमान खान हा बिग बॉस सीजन 18 चे शूटिंग करत होता. शूटिंग अर्धेवट सोडून तो रूग्णालयात पोहोचला.
हेच नाही तर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याला परत जीवे मारण्याची धमकी ही लॉरेन्स बिश्नोई गँगकडून देण्यात आलीये. सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ आता करण्यात आलीये. 14 एप्रिल रोजी पहाटे देखील सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला. ज्यावेळी हा गोळीबार करण्यात आला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता.
आता या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई याचा चुलत भाऊ रमेश बिश्नोई याने मोठा खुलासा केलाय. हेच नाही तर सलमान खान याच्याबद्दल हा खुलासा पहिल्यांदाच करण्यात आलाय. रमेश बिश्नोई याने मोठा दावा केलाय. रमेश बिश्नोई म्हणाला की, ज्यावेळी काळवीट शिकार प्रकरण सुरू होते. त्यावेळी सलमान खान हा आमच्या समाजाच्या काही प्रमुख मंडळी पुढे हजर झाला होता.
हेच नाही तर त्यावेळी सलमान खान हा कोरे चेकबुक घेऊन आला होता आणि केस बंद करण्याच्या बदल्यात हवी ती रक्कम चेकवर टाकण्यास सांगत होता. आम्ही जर पैशांसाठी हे करत असतो तर त्यावेळीच पैसे स्वीकारले असते ना. आता रमेश बिश्नोई याच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी एका मुलाखतीमध्ये थेट म्हटले की, आमच्या कुटुंबाने आतापर्यंत साध्या किड्याला देखील मारले नाहीये.