भारतीय खेळाडू लग्नाआधी झाला पिता; अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर! संजय दत्तच्या दुसऱ्या पत्नीसोबत खास कनेक्शन

खासगी आयुष्यामुळे प्रसिद्ध खेळाडू अनेकदा अडकला वादाच्या भोवऱ्यात; संजय दत्त याच्या दुसऱ्या पत्नीसोबत असलेले नातं पडलं महागात..., लग्नाआधी झाले एका मुलीचे पीता

भारतीय खेळाडू लग्नाआधी झाला पिता; अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर! संजय दत्तच्या दुसऱ्या पत्नीसोबत खास कनेक्शन
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 3:39 PM

मुंबई : झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी कायम त्यांच्या खासगी आयु्ष्यामुळे चर्चेत असतात. बॉलिवूडच्या अभिनेत्री आणि खेळाडू यांचं फार जुनं नातं आहे. जगातील महान टेनिसपटूंच्या पैकी एक म्हणजे भारताचे माजी टेनिसपटू लिएंडर पेस.  लिएंडर पेस देखील त्यांच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आले. खेळाडू म्हणून त्यांनी जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली. पण खासगी आयुष्यात त्यांना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा हिच्यासोबत असलेलं दोन वर्षांचं नातं तुटल्यामुळे लिएंडर पेस सध्या तुफान चर्चेत आले आहेत. किम शर्मा हिच्या आधी अनेक अभिनेत्रींसोबत लिएंडर पेस यांचं नाव जोडण्यात आलं.

अनेक अभिनेत्रीसोबत खास कनेक्शन असलेले लिएंडर पेस लग्नाआधी पती झाले, ज्यामुळे ते चर्चेत आले होते. लिएंडर पेस आणि रिया पिल्लई दोघे अनेक वर्ष लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होते. २००३ दरम्यान लिएंडर पेस आणि रिया पिल्लई यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. तेव्हा रिया पिल्लई अभिनेता संजय दत्त याची पत्नी होती. पण २००५ साली रिया आणि संजय यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

संजय दत्त याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर लिएंडर पेस आणि रिया पिल्लई यांनी लग्न केलं नाही. २००५ साली दोघांनी त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला. तेव्हा रिया पिल्लई प्रेग्नेंट होती. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण काही वर्षांनंतर रिया हिने २०१४ मध्ये लिएंडर यांच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले. हे प्रकरण अनेक वर्ष कोर्टात सुरु होतं. त्यानंतर लिएंडर पेस आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

रियासोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी लिएंडर पेस बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरी हिला डेट करत होते. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. अखेर महिमा चौधरी हिने लिएंडर पेस यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडल्यानंतर लिएंडर पेस यांचं नाव अभिनेत्री किम शर्मा हिच्यासोबत जोडलं जावू लागलं. सोशल मीडियावर दोघांचे अनेक रोमाँटिक फोटो देखील आहेत. २०२१ मध्ये किम हिने फोटो शेअर सर्वांसमोर नात्याची कबूली दिली. पण दोन वर्षांनंतर किम आणि लिएंडर पेस यांचे मार्ग वेगळे झाले आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.