Lock Upp 2 मध्ये ‘बिग बॉस 16’च्या बहुचर्चित स्पर्धकाची होणार एण्ट्री; आणणार कंगना रनौतच्या नाकीनऊ

बिग बॉस 16 मधील एका बहुचर्चित स्पर्धकाला आता कंगना रनौतच्या 'लॉक अप 2'मध्ये एण्ट्री मिळाल्याचं कळतंय. मात्र या स्पर्धकामुळे कंगनालाही चांगलाच घाम फुटणार आहे. बिग बॉसच्या घरात असताना या स्पर्धकाने सलमान खानच्याही नाकीनऊ आणलं होतं.

Lock Upp 2 मध्ये 'बिग बॉस 16'च्या बहुचर्चित स्पर्धकाची होणार एण्ट्री; आणणार कंगना रनौतच्या नाकीनऊ
Kangana Ranaut in Lock Upp 2Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 12:28 PM

मुंबई: रॅपर एमसी स्टॅन हा जरी बिग बॉस 16 चा विजेता ठरला असला तरी इतर स्पर्धकांचीही लोकप्रियता काही कमी नाही. म्हणूनच बिग बॉस 16 मधील एका बहुचर्चित स्पर्धकाला आता कंगना रनौतच्या ‘लॉक अप 2’मध्ये एण्ट्री मिळाल्याचं कळतंय. मात्र या स्पर्धकामुळे कंगनालाही चांगलाच घाम फुटणार आहे. बिग बॉसच्या घरात असताना या स्पर्धकाने सलमान खानच्याही नाकीनऊ आणलं होतं. त्यामुळे आता कंगना तिला कसं हाताळणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ही स्पर्धक दुसरी तिसरी कोणी नसून अर्चना गौतम असल्याचं कळतंय. लॉक अपचा पहिला सिझन चांगलाच गाजला होता. त्यामुळे आता दुसऱ्या सिझनचीही चाहत्यांना खूप उत्सुकता आहे.

अर्चनाला मिळाली ऑफर

अर्चना गौतमला एकता कपूरच्या या शोची ऑफर मिळाली आहे. मात्र त्यावर अद्याप अर्चनाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. कंगनाच्या जेलमध्ये अर्चनाला पाहण्यासाठी चाहते मात्र फारच उत्सुकत आहेत. बिग बॉस 16 च्या घरातही ती सर्वांत चर्चेतल्या स्पर्धकांपैकी एक होती. इतकंच नव्हे तर ग्रँड फिनालेपर्यंत ती पोहोचली होती.

कोण आहे अर्चना गौतम?

अर्चनाचा जन्म उत्तरप्रदेशमधील मेरठ याठिकाणी झाला. तिने ‘मिस बिकिनी इंडिया 2018’चा किताब जिंकला होता. ‘मिस कॉसमॉस वर्ल्ड 2018’ आणि ‘मोस्ट टॅलेंट 2018’ या स्पर्धांमध्येही तिने भाग घेतला होता. 2015 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ग्रेट ग्रँड मस्ती, हसीना पारकर आणि बारात कंपनी यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

बिग बॉसनंतर जर अर्चना गौतम ‘लॉक अप 2’मध्ये दिसत असेल तर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा डोस अजिबात कमी होणार नाही हे नक्की. कंगनाचा हा शो मार्चमध्ये सुरू होणार आहे. मात्र निर्मात्यांनी या शोची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. केवळ अर्चनाच नाही तर शिव ठाकरेलाही या शोची ऑफर मिळाल्याचं कळतंय. शिव ठाकरे हा बिग बॉस 16 चा विजेता ठरेल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र ऐनवेळी एमसी स्टॅनने बाजी मारली.

कंगनाच्या ‘लॉक अप’ या शोच्या पहिल्या सिझनचा विजेता मुनावर फारूखी ठरला होता. 70 दिवसांच्या संघर्षानंतर त्याने ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. लॉक अप या शोमध्ये नॉमिनेशनपासून वाचण्यासाठी स्पर्धकांना त्यांच्या खासगी आयुष्यातील धक्कादायक खुलासे करावे लागतात. पहिल्या सिझनमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींनी त्यांच्या खासगी आयुष्यातील खुलासे केले होते.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.