Love Life | 2 वर्षात अभिनेत्रीचा घटस्फोट, ८ वर्षांपासून राहते एकटी, त्याने मात्र थाटला तिसरा संसार

Love Life | अभिनेत्रीच्या सौंदर्यावर चाहते फिदा, तिचं खासगी आयुष्य मात्र प्रचंड खडतर, घटस्फोटाला अनेक वर्ष होवून नाही केलं लग्न, पण त्याने थाटला तिसरा संसार... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा... घटस्फोटानंतर नाही केलं लग्न. मुलासोबत जगते आनंदी आयुष्य...

Love Life | 2 वर्षात अभिनेत्रीचा घटस्फोट, ८ वर्षांपासून राहते एकटी, त्याने मात्र थाटला तिसरा संसार
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 9:08 PM

मुंबई | 03 सप्टेंबर 2023 | झगमगत्या विश्वात असे अनेक कपल आहेत, जे चाहत्यांना कायम कपल गोल्स देताना दिसतात. चाहते देखील सेलिब्रिटी कपल्सना फॉलो करताना दिसतात. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील  व्हायरल होत असतात. पण याच सेलिब्रिटी कपल्सने विभक्त होण्याचा निर्णय घेतला, तर चाहत्यांना मोठा धक्का बसतो. पण झगमगत्या विश्वात असं अनेकदा झालं आहे. अभिनेता करण सिंग ग्रोव्हर आणि अभिनेत्री जेनिफर विंगेट यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. प्रेमात अडकल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या दोन वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

घटस्फोटानंतर देखील दोघांनी नात्यावर मौन बाळगलं होतं. पण अनेक वर्षांनंतर एका मुलाखतीत अभिनेत्रीने करण सिंग ग्रोव्हर यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल खुलासा केला. आमच्यामध्ये जे काही झालं त्यात कोणाचाही दोष नाही, असं अभिनेत्रीचं म्हणणं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. मालिकाच्या सेटवरच जेनिफर आणि करण सिंग ग्रोव्हर यांची भेट झाली. भेटीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 2012 मध्ये जेनिफर आणि करण यांनी लग्न केलं.

एका मुलाखतीत अभिनेत्रीने घटस्फोटाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मला विश्वास आहे की, इतक्या मोठ्या निर्णयासाठी आम्ही दोघेही तयार नव्हतो. आम्ही दोघेही ते पाऊल उचलायला तयार नव्हतो. आम्ही इतके दिवस मित्र होतो. प्रत्येक वेळी आम्ही भेटायचो. पण ती वेळ एक दुर्दैवी वेळ होती. जे झालं त्यात कोणाचाही दोष नव्हता…’ असं अभिनेत्री जेनिफर विंगेट म्हणाली.

करण सिंग ग्रोव्हर याच्यापासून विभक्त झाल्यानंतर जेफिनरने दुसरं लग्न केलं नाही. अभिनेत्री मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. तर अभनेता करण सिंग ग्रोव्हर याने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू हिच्यासोबत लग्न केलं. बिपाशा बासू हिच्यासोबत अभिनेत्याचं तिसरं लग्न आहे. करण आणि बिपाशा यांच्या लग्नाची तुफान चर्चा रंगली. ३० एप्रिल २०१६ मध्ये दोघांनी लग्न केलं..

लग्नाच्या ६ वर्षांनंतर अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. करण आणि बिपाशा यांच्या मुलीचं नाव देवी असं आहे. बिपाशा कायम देवीसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. शिवाय करण देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असतो. सध्या करण पत्नी बिपाशा बासू आणि मुलगी देवी यांच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.