‘लग्नाआधी टेस्ट ड्राइव्ह का नाही?’; Lust Stories 2 च्या टीझरमध्ये नीना गुप्ता यांचा सवाल ऐकून उंचावल्या नेटकऱ्यांच्या भुवया

'एखादी नवीन गाडी घेण्याआधी टेस्ट ड्राइव्हचा पर्याय दिला जातो, तसा पर्याय लग्नाच्या बाबतीतही असायला हवा', असं नीना गुप्ता म्हणतात. त्यानंतर चार वेगवेगळ्या कथांची छोटी झलक टीझरमध्ये पहायला मिळते. या टीझरवर प्रेक्षकांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

'लग्नाआधी टेस्ट ड्राइव्ह का नाही?'; Lust Stories 2 च्या टीझरमध्ये नीना गुप्ता यांचा सवाल ऐकून उंचावल्या नेटकऱ्यांच्या भुवया
Lust Stories 2 teaserImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 1:42 PM

मुंबई : ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लस्ट स्टोरीज 2’चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला नेटकऱ्यांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. या दुसऱ्या भागात काजोल, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, विजय वर्मा, मृणाल ठाकूर आणि विजय वर्मासह इतरही कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘लस्ट स्टोरीज’चा पहिला भाग 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी चार कथा दिग्दर्शित केल्या होत्या. त्यात अनुराग कश्यप, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी आणि करण जोहर यांचा समावेश होता. स्त्रियांच्या कामुक भावनेबद्दलच्या विविथ कथा यात आधुनिक दृष्टीकोनातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आल्या होत्या.

‘लस्ट स्टोरीज 2’च्या टीझरच्या सुरुवातीला नीना गुप्ता, काजोल, तमन्ना आणि इतर कलाकारांची झलक पहायला मिळते. ‘एखादी नवीन गाडी घेण्याआधी टेस्ट ड्राइव्हचा पर्याय दिला जातो, तसा पर्याय लग्नाच्या बाबतीतही असायला हवा’, असं नीना गुप्ता म्हणतात. त्यानंतर चार वेगवेगळ्या कथांची छोटी झलक टीझरमध्ये पहायला मिळते. या टीझरवर प्रेक्षकांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

तमन्ना आणि विजयला एकत्र पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या डेटिंगच्या जोरदार चर्चा आहेत. तर काहींनी नीना गुप्ता यांच्या अभिनयाचं कौतुक केलंय. काजोललाही वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा टीझर

पहिल्या भागात राधिका आपटे, भूमी पेडणेकर, मनिषा कोइराला, कियारा अडवाणी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्यासोबत आकाश ठोसर, विकी कौशल, नेहा धुपिया यांनीसुद्धा दमदार भूमिका साकारल्या होत्या. आता दुसऱ्या भागातही चार वेगवेगळे दिग्दर्शक चार कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. त्यात अमित रविंद्रनाथ शर्मा, कोंकना सेन शर्मा, आर. बाल्की आणि सुजॉय घोष यांचा समावेश आहे. येत्या 29 जून रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘लस्ट स्टोरीज 2’ प्रदर्शित होणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.