सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात का नाही आले भाऊ? 7 महिन्यांनंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी सोडलं मौन

Shatrughan Sinha on Sonakshi Sinha Wedding: मुस्लिम मुलासोबत लग्न केलं म्हणून सोनाक्षीच्या लग्नात उपस्थित नव्हते भाऊ? अभिनेत्रीच्या लग्नाच्या 7 महिन्यांनंतर शत्रुघ्न सिन्हा यांचा मोठा खुलासा, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षीच्या लग्नाची चर्चा...

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात का नाही आले भाऊ?  7 महिन्यांनंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी सोडलं मौन
Follow us
| Updated on: Dec 14, 2024 | 9:03 AM

Shatrughan Sinha on Sonakshi Sinha Wedding: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने सात वर्ष अभिनेता झहीर इक्बाल याला डेट केल्यानंतर लग्न केलं. 23 जून 2024 मध्ये सोनाक्षी आणि झहीर यांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नात कुटुंबिय आणि खास मित्र उपस्थित होते. पण बहिणीच्या लग्ना भाऊ उपस्थित नसल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. लग्नात अभिनेत्रीचा भाऊ लव सिन्हा कुठेच दिसला नाही. पण कुश सिन्हा फार कमी दिसला. सोनाक्षीच्या लग्नात दोन्ही भाऊ नसल्यामुळे सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये अनेक चर्चा रंगल्या. सोनाक्षीने मुस्लिम मुलासोबत लग्न केलं म्हणून अभिनेत्रीचे भाऊ नाराज असल्याच्या चर्चांनी जोर घरला होता.

शिवाय सोनाक्षीच्या लग्ना दरम्यान लव सिन्हा सोशल मीडियावर अनेक क्रिप्टिक पोस्ट शेअर करत होता. ज्यामुळे चर्चांना अधिक उधाण आलं. अखेर सोनाक्षीच्या लग्नाच्या 7 महिन्यानंतर ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मौन सोडलं आहे. सोनाक्षीच्या लग्नात तिचे भाऊ का दिसत नव्हते.. यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी मोठा खुलासा केला आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं की, ‘मी कोणतीही तक्रार करणार नाही. ते देखील व्यक्ती आहे. ते कदाचित अद्याप इतके परिपक्व नसावे. मी त्यांची वेदना आणि अडचण समजू शकतो. सांस्कृतिक प्रतिक्रिया नेहमीच असते. मी त्यांच्या वयाचा असतो तर मी देखील असंच केलं असतं. पण तुमची परिपक्वता, वरिष्ठता आणि अनुभव एक वेगळी भूमिका बजावते… त्यामुळे माझी प्रतिक्रिया माझ्या मुलांइतकी तीव्र नव्हती.’ असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले, ‘मुलीने आंतरधर्मीय विवाह केलाय याला माझा पाठिंबा आहे. मी माझ्या मुलीला सपोर्ट करतो. असं न करण्यासाठी कोणतंच कारण नाही. तिचं लग्न आहे आणि लग्न तिच्या इच्छेनुसार व्हायला हवं… मी किंवा कोणी विरोध करणारे कोण आहोत? वडिलांच्या स्थानावर असल्यामुळे मुलीला सपोर्ट करणं माझं कर्तव्य आहे.. तिने काहीही बेकायदेशीर काम केलेलं नाही. तिच्या लग्नाच्या पार्टीचा देखील मी आनंद घेतला. अन्य पाहुण्यांना भेटून मला चांगलं वाटलं… सोनाक्षी आणि झहीर एकमेकांसोबत चांगले दिसतात…’ असं देखील शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

सांगायचं झालं तर, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी रजिस्टर्ड पद्धतीत लग्न केलं. घरीच दोघांचं लग्न झालं. त्यानंतर रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. दोघांच्या लग्नात सलमान खान, रेखा, काजोल, हुमा कुरैशी यांसारखे अनेक सेलिब्रिटी होते.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.