Made In Heaven 2 | ‘मेड इन हेवन 2’मधल्या ट्रान्सजेंडर अभिनेत्रीची जोरदार चर्चा; कोण आहे त्रिनेत्रा हालदार?

या दुसऱ्या सिझनमध्येही कलाकारांची मोठी फौज पहायला मिळणार आहे. नव्या सिझनमध्ये प्रेक्षकांना काही नवीन चेहरेसुद्धा दिसणार आहेत. त्यामध्ये मृणाल ठाकूर, दिया मिर्झा, त्रिनेत्रा हालदार यांचा समावेश आहे.

Made In Heaven 2 | 'मेड इन हेवन 2'मधल्या ट्रान्सजेंडर अभिनेत्रीची जोरदार चर्चा; कोण आहे त्रिनेत्रा हालदार?
त्रिनेत्रा हालदारImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 9:52 AM

मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : ‘मेड इन हेवन’ या वेब सीरिजचा पहिला सिझन गाजल्यानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या सिझनची प्रचंड उत्सुकता होती. अखेर ‘मेड इन हेवन 2’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. या दुसऱ्या सिझनमध्येही कलाकारांची मोठी फौज पहायला मिळणार आहे. नव्या सिझनमध्ये प्रेक्षकांना काही नवीन चेहरेसुद्धा दिसणार आहेत. त्यामध्ये मृणाल ठाकूर, दिया मिर्झा, त्रिनेत्रा हालदार यांचा समावेश आहे. यापैकी त्रिनेत्रा ही पहिली ट्रान्सजेंडर अभिनेत्री आहे. तिने नुकतंच अभिनयविश्वात पाऊल ठेवलं आहे. तिच्याविषयी सोशल मीडियावर कुतूहल निर्माण झालं आहे.

कर्नाटकची पहिली ट्रान्सजेंडर डॉक्टर

त्रिनेत्रा हालदार ही पेशाने डॉक्टर आहे आणि कर्नाटकमधील ती पहिली ट्रान्सजेंडर डॉक्टर आहे. यासाठी तिला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. आयुष्यातील आव्हानांना ठामपणे सामोरं जात जेव्हा त्रिनेत्रा डॉक्टर बनली, तेव्हा अनेकांसाठी ती प्रेरणास्थान झाली. त्रिनेत्राचा बेंगळुरूमध्ये जन्म झाला आणि आईवडिलांनी तिचं नाव अंगद असं ठेवलं. सुरुवातीच्या काळात ती आईची साडी नेसून मेकअप करून फिरायची. तेव्हा अनेकांनी तिची खिल्ली उडवली. लहानपणीचं खुळ असं समजून कुटुंबीयांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र नंतर जेव्हा या गोष्टी बदलल्या नाहीत, तेव्हा बऱ्याच समस्या निर्माण झाल्या.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Trinetra (@trintrin)

आईवडिलांकडून मिळाली साथ

त्रिनेत्रा ही अभ्यासात फार हुशार होती आणि शाळेतील इतर कार्यक्रमांमध्ये, स्पर्धांमध्ये ती आवर्जून भाग घ्यायची. शालेय जीवनातही तिच्यासमोर अनेक आव्हानं होती. इतर मित्रमैत्रिणींनी तिचा स्वीकार केला नाही. मात्र आईवडिलांनी साथ दिल्याने त्रिनेत्रासाठी हा प्रवास थोडा कमी त्रासदायक ठरला. बारावीपर्यंत बऱ्याचशा गोष्टी सुधारू लागल्या होत्या.

त्रिनेत्राची समाजसेवा

त्रिनेत्रा ही एक डॉक्टर आणि आता एक अभिनेत्री बनली असली तरी समाजसेवेतही तिचा पुढाकार आहे. देशात LGBTQIA द्वारा एका ग्रुपमध्ये ती सहभागी आहे. ती अनेकदा स्वास्थ्याशी संबंधित, असमानता, शारीरिक विकृती यांबद्दल अभियान चालवते.

‘मेड इन हेवन’च्या आधीही केलं काम

त्रिनेत्राने याआधी नेटफ्लिक्सच्या ‘बहस प्लॅनिंग’ या सीरिजमध्ये काम केलं आहे. यावेळी तिच्यासोबत कुशा कपिला, सृष्टी दीक्षित यांसारखे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झळकले होते.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....