‘मेरा दिल ये पुकारे’ गाण्यावर माधुरी दीक्षितचा डान्स; Video पाहून नेटकरी म्हणाले..

पाकिस्तानी तरुणीच्या 'मेरा दिल ये पुकारे' डान्सला बॉलिवूडचा तडका; पहा माधुरी दीक्षित खास व्हिडीओ

'मेरा दिल ये पुकारे' गाण्यावर माधुरी दीक्षितचा डान्स; Video पाहून नेटकरी म्हणाले..
'मेरा दिल ये पुकारे' गाण्यावर माधुरी दीक्षितचा डान्सImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 9:16 AM

मुंबई: तुम्ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असाल तर ‘मेरा दिल ये पुकारे आजा..’ या गाण्यावर व्हायरल झालेला पाकिस्तानी मुलीचा डान्स व्हिडीओ तुम्हाला नक्कीच माहीत असेल. मेहंदीच्या कार्यक्रमात हिरव्या रंगाचा सैल ड्रेस घातलेली एक मुलगी या जुन्या गाण्यावर नाचते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. आता त्याच गाण्यावर बॉलिवूडची ‘एक्स्प्रेशन क्वीन’ माधुरी दीक्षितने डान्स केला आहे.

आयेशा नावाच्या एका पाकिस्तानी मुलीच्या लग्नातील डान्सचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 1954 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नागिन’ या चित्रपटातील हे मूळ गाणं आहे. मात्र त्याच्या रिमिक्स व्हर्जनवरील पाकिस्तानी मुलीच्या डान्सने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. आता माधुरी तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये साडीवर या गाण्यावर थिरकली आहे.

हे सुद्धा वाचा

व्हायरल व्हिडीओतील तरुणीचे काही डान्स स्टेप्स माधुरीने जसंच्या तसं केले, मात्र त्यात ‘धकधक गर्ल’ने थोडासा ट्विस्ट दिला. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काहीजण माधुरीच्या डान्सचं कौतुक करत आहेत. तर काही युजर्स तिला डान्स स्टेप्स कॉपी न करण्याचा सल्ला देत आहेत.

डीजे उस्मान भट्टीने रिमिक्स केलेलं ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ या गाण्याने नेटकऱ्यांचं लक्ष तेव्हा वेधलं, जेव्हा आयेशा नावाच्या तरुणीने 11 नोव्हेंबर रोजी तिच्या लग्नात त्यावर डान्स केला. या डान्स व्हिडीओमुळे लाहोरमधली आयेशा रातोरात सोशल मीडिया स्टार बनली.

आयेशाचा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे पाकिस्तानमधील लग्नात वाजलेलं लता मंगेशकर यांचं गाणं. नागिन या चित्रपटातील मूळ गाणं लतादीदींनी गायलं होतं. तर वैजंतीमाला आणि प्रदीप कुमार यांच्यावर ते चित्रित करण्यात आलं होतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.