डॉक्टर नेने नाही तर, गडगंज श्रीमंत व्यक्तीच्या प्रेमात होती माधुरी दीक्षित, दिग्दर्शकाला कराला लागला करार कारण…
Madhuri Dixit Love Life : लग्नाआधी गडगंज श्रीमंत व्यक्तीच्या प्रेमात होती अभिनेत्री माधुरी दीक्षित... प्रेम असं होतं, ज्यामुळे दिग्दर्शक देखील घाबरला... फार कमी लोकांना माहिती आहे 'धक-धक गर्ल'च्या खासगी आयु्ष्याबद्दल... जाणून तुम्हाला देखील बसेल मोठा
मुंबई | 15 जानेवारी 2024 : अभिनेत्री माधुरी दीक्षित आज देखील कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आज माधुरी तिच्या वैवाहिक आयुष्यात अत्यंत आनंदी आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आली होती. डॉक्टर श्रीराम नेने याच्यंसोबत लग्न करण्याआधी अभिनेत्रीचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं होतं. याच दरम्यान, एका विवाहित आणि गडगंज श्रीमंत अभिनेत्यासोबत माधुरी हिच्या नावाची चर्चा रंगली होती. अभिनेता त्याच्या पहिली पत्नी आणि लेकीला सोडून माधुरी हिच्यासोबत लग्न करेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. याचीच भीती दिग्दर्शकाच्या मनात होती. म्हणून दिग्दर्शकाने दोघांकडून एक करार करुन घेतला.
सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगत आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता संजय दत्त आहे. संजूबाबा आणि माधुरी यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. एकत्र काम करत असताना दोघांमध्ये प्रेम देखील बहरलं… असं अनेकदा सांगण्यात देखील आलं..
‘खलनायक’ सिनेमात संजय दत्त, माधुरी दीक्षित यांच्यासोबत अभिनेते जॅकी श्रॉफ देखील होते. सिनेमाची शुटिंग सुरु असताना माधुरी आणि संजय दत्त यांच्या रिलेशनशिपच्या देखील चर्चा रंगत होत्या. याचीच भीती ‘खलनायक’ सिनेमाचे दिग्दर्शक सुभाष घाई यांना सतावत होती.
सिनेमाच्या शूटिंगदरम्यान माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असता तर, त्याचा वाईट परिणार सिनेमच्या कथेवर झाला असता… अशी भीती सुभाष घाई यांना होती. कारण सिनेमात दोघे एकमेकांचे शत्रू होते. मनात असलेली भीती कमी करण्यासाठी सुभाष घई यांनी एक युक्ती शोधून काढली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुभाष घई यांनी एक करार केला आणि हा करार संजय दत्त आणि माधुरी दीक्षित या दोघांनी देखील मान्य केला. सिनेमा पूर्णपणे तयार होऊन प्रदर्शित होईपर्यंत दोघेही एकमेकांशी लग्न करणार नाहीत, असे या करारात स्पष्ट लिहिलं होतं. कारण दोघांचं लग्न झालं असतं, तर त्याचा फटका सिनेमाला बसला असता.. लोकांचं लक्ष दिग्दर्शकांना माधुरी दीक्षित आणि संजय दत्तकडे वळवायचे नव्हतं.
रिपोर्टनुसार, तेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरी आणि संजय दत्त यांच्या नात्याच्या चर्चा रंगलेल्यो होत्या. पण आता दोघे देखील त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे.