AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाभारत’मधील द्रौपदीला गाडीतून ओढून 20 जणांनी केला होता हल्ला; दोन वेळा झाला ब्रेन हॅमरेज

22 मे 2016 रोजी पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बरमध्ये एका राजकीय पक्षाच्या जवळपास 20 कार्यकर्त्यांनी रुपा यांच्यावर हल्ला केला होता. हा हल्ला इतका भयंकर होता की त्यांचा दोन वेळा ब्रेन हॅमरेज झाला होता.

'महाभारत'मधील द्रौपदीला गाडीतून ओढून 20 जणांनी केला होता हल्ला; दोन वेळा झाला ब्रेन हॅमरेज
Roopa GangulyImage Credit source: IANS
| Updated on: Jul 23, 2023 | 5:42 PM
Share

मुंबई | 23 जुलै 2023 : बी. आर. चोप्रा यांची ‘महाभारत’ मालिका आजही लोकांच्या मनात घर करून आहे. यानंतर छोट्या आणि मोठ्या पडद्यावर अनेकदा रामायण आणि महाभारत बनवले गेले. परंतु रामानंद सागर आणि बी. आर. चोप्रा यांच्या ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ मालिकांनी प्रेक्षकांच्या हृदयात जे स्थान निर्माण केलं, ते आजही कोणतीच मालिका करू शकली नाही. महाभारतातील सर्वांत आव्हानात्मक भूमिका म्हणजे द्रौपदी. हीच व्यक्तीरेखा साकारून अभिनेत्री रुपा गांगुली यांनी लोकांच्या हृदयात कायमचं स्थान निर्माण केलं. मात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठ्या घटनेविषयी तुम्हाला माहीत आहे का?

रुपा गांगुली यांचं करिअर

रुपा गांगुली यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ‘निरुपमा’ या शॉर्ट फिल्मद्वारे केली होती. त्यानंतर त्यांनी ‘मुक्ता बांधा’ या बंगाली मालिकेसह अनेक बंगाली चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मात्र बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेमुळे त्यांना खरी लोकप्रियता मिळाली. यामध्ये त्यांनी द्रौपदीची भूमिका साकारली होती. द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा सीन त्यांनी एकाच टेकमध्ये पूर्ण केला होता असं म्हटलं जातं. मात्र याच सीनदरम्यान त्या सेटवर अर्धा तास रडत होत्या.

दु:शासनाशी कधीच बोलल्या नाहीत

एका मुलाखतीत रुपा गांगुली यांनी सांगितलं होतं की वस्त्रहरणाच्या सीनचा त्यांच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला होता. याच कारणामुळे त्या सीनच्या शूटिंगच्या आधी आणि त्यानंतर त्या दु:शासनाची भूमिका साकारणारे विनोद कपूर यांच्याशी कधीच बोलल्या नाहीत. परंतु व्यक्ती म्हणून ते खूप चांगले होते, असं त्यांनी सांगितलं.

2015 मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात

रुपा गांगुली यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली होती, ज्याचा त्यांनी कधी विचारसुद्धा केला नसेल. टीव्ही आणि चित्रपटांपासून दूर गेल्यानंतर 2015 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र हावडा उत्तर या मतदारसंघातून त्या पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना राज्यसभेसाठी नामांकन मिळालं. रुपा गांगुली यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक गोष्टी घडल्या होत्या.

रुपा गांगुली यांच्यावर मॉब लिंचिंग

22 मे 2016 रोजी पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बरमध्ये एका राजकीय पक्षाच्या जवळपास 20 कार्यकर्त्यांनी रुपा यांच्यावर हल्ला केला होता. हा हल्ला इतका भयंकर होता की त्यांचा दोन वेळा ब्रेन हॅमरेज झाला होता. याविषयीची माहिती खुद्द रुपा यांनी ट्विट करत दिली होती. त्यांनी सांगितलं की त्यांना कारमधून बाहेर खेचण्यात आलं होतं. यामध्ये पोलीसदेखील सामील होते. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर रुपा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना दोन वेळा ब्रेन हॅमरेजचा सामना करावा लागला होता. रुपा गांगुली यांनी स्वत:ला कलाविश्वापासून दूर केलं असलं तरी त्या सध्या राजकारणात सक्रिय आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.