Gufi Paintal | मृत्यूपूर्वी कशी होती ‘महाभारता’तील शकुनी मामा यांची अवस्था? पुतण्याने सांगितले शेवटचे क्षण

शेवटच्या क्षणी कशी होती शकुनी मामा यांची अवस्था? पुतण्याने सांगितले अभिनेत्याचे शेवटचे क्षण.... सध्या सर्वत्र गुफी पेंटल यांच्या निधनाची चर्चा...

Gufi Paintal | मृत्यूपूर्वी कशी होती ‘महाभारता’तील शकुनी मामा यांची अवस्था? पुतण्याने सांगितले शेवटचे क्षण
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 3:06 PM

मुंबई : ‘महाभारता’तील शकुनी मामा यांची भूमिका साकारणारे अभिनेते गुफी पेंटल यांचं सोमवारी निधन झालं आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी गुफी पेंटल यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी गुफी पेंटल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाशी संबंधित आरोग्य समस्यांमुळे त्यांचं निधन झालं आहे. गुफी पेंटल यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी गुफी पेंटल यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. सध्या सर्वत्र गुफी पेंटल यांच्या निधनाची चर्चा सुरु आहे. दरम्यान, गुफी पेंटल यांचा पुतण्या आणि अभिनेता हितेन पेंटल यांनी काकांच्या निधनपूर्वीच्या क्षणांबद्दल सांगितलं आहे.

नुकताच एक मुलाखतीत हितेय याने गुफी पेंटल यांच्या निधनाबद्दल मोठा खुलासा केला आहे. हितेन म्हणाला, ‘गुफी काका यांचं निधन सोमवारी सकाळी जवळपास ९ वा. च्या सुमारास झालं. आजची सकाळ आमच्यासाठी प्रचंड वेदनादायक होती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती, पण अचानक आज सकाळी त्यांचं निधन झालं.’

गुफी पेंटल यांच्याबद्दल पुढे अभिनेता म्हणाला, ‘गुफी काकांसोबत आज सकाळी आठ वाजता बोलणं झालं. थोड्या वेळानंतर ते झोपले. त्यानंतर गुफी काका उठलेच नाहीत. झोपेतच त्यांचं निधन झालं.’ गुफी पेंटल यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. गुफी पेंटल यांना सात ते आठ दिवसांपूर्वी अंधेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

हे सुद्धा वाचा

रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा गुफी पेंटल यांची प्रकृती नाजूक होती. हितेनने दोन दिवसांपूर्वी गुफी पेंटल यांच्या आरोग्याबाबतचे अपडेटही मीडियाला दिले होते. हितेन म्हणाला होता, ‘गुफी काका अनेक दिवसांपासून अस्वस्थ होते. सुरुवातीला त्यांना हृदयविकाराचा आजार होता आणि नंतर किडनीचा त्रास होवू लागला. दोन दिवसांपूर्वीपर्यंत त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पण रविवारी ​​डॉक्टरांनी आम्हाला कळवले की त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं.’

बीआर चोपडा यांची ‘महाभारत’ ही मालिका त्याकाळी खूप गाजली होती. यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. ‘महाभारत’ मालिकेशिवाय गुफी यांनी कानून, सौदा, अकबर बीरबल, कर्ण संगिनी यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. शिवाय अनेक सिनेमांमध्ये देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.