अवघ्या 11 महिन्यांत ‘महादेव’ फेम मोहीत रैनाचा घटस्फोट? ‘या’ कारणामुळे चर्चांना उधाण

1 जानेवारीला बांधली लग्नगाठ, डिसेंबरपर्यंतही टिकलं नाही नातं; 'महादेव' फेम मोहीत रैनाचा घटस्फोट?

अवघ्या 11 महिन्यांत 'महादेव' फेम मोहीत रैनाचा घटस्फोट? 'या' कारणामुळे चर्चांना उधाण
Mohit RainaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 20, 2022 | 9:57 AM

मुंबई: ‘महादेव’ या पौराणिक मालिकेत शंकराची भूमिका साकारून अभिनेता मोहीत रैना घराघरात पोहोचला. काही महिन्यांपूर्वीच मोहीतने लग्नगाठ बांधली. मात्र त्याच्या वैवाहिक आयुष्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यामागचं कारण म्हणजे मोहीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. म्हणून त्याच्या घटस्फोटाच्या चर्चा नेटकऱ्यांमध्ये होऊ लागल्या आहेत. मात्र यात नेमकं सत्य काय आहे, हे मोहीतच सांगू शकेल.

इन्स्टाग्रामवरून डिलीट केले फोटो

मोहीत रैना आणि अदिती शर्मा 1 जानेवारी 2022 रोजी लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर अचानक लग्नाचे फोटो पोस्ट करत त्यांना चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मात्र आता मोहीतने सोशल मीडियावरून लग्नाचे फोटोच डिलीट केले आहेत. इतकंच नाही तर लग्नानंतर अदितीसोबतच्या पहिल्या होळीचा फोटोसुद्धा त्याने इन्स्टाग्रामवरून काढून टाकला आहे. यानंतरच त्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Mohit Raina (@merainna)

घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

मोहीतच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अदितीसोबतचा फक्त एकच फोटो आहे, जो 1 जून रोजी पोस्ट केला होता. वैवाहिक आयुष्यात काही समस्या असल्याच्या चर्चांवर अद्याप मोहीत किंवा अदितीने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मोहीतप्रमाणे अदिती ही कलाविश्वातील नाही. अदिती तंत्रज्ञानाशी संबंधित काही कामं करते. मोहीत त्याच्या खासगी आयुष्याबद्दल फारसा व्यक्त होत नाही. या दोघांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली.

मोहीत रैना टेलिव्हिजन इंडस्ट्रीत चांगलाच लोकप्रिय आहे. देवों के देव.. महादेव या मालिकेतून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने उरी: द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटातही भूमिका साकारली. त्याचसोबत काफीर, भौकाल, मुंबई डायरीज 26/11 यांसारख्या वेब सीरिजमध्येही तो झळकला.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.