Adipurush: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदीपुरुष? तरुणाचं ट्विट, पोलिसांकडून दखल; म्हणाले, तुझा नंबर…
'आदीपुरुष' आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काय कनेक्शन? फोटो पोस्ट करणाऱ्या नेटकऱ्यावर पोलीस करणार कारवाई? फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल...

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र ‘आदीपुरुष’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. सिनेमात अभिनेता प्रभास, सैफ अली खान, देवदत्त नागे आणि अभिनेत्री क्रिती सनॉन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर देखील सिनेमातील प्रमुख कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान एका नेटकऱ्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काही संबंध असताना एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामुळे ठाणे पोलीस काय कारवाई करणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे. नेटकऱ्याने पोस्ट केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. शिवाय त्यांच्या संबंध आदिपुरुषासोबत जोडण्यात आला आहे. नेटकऱ्याने एकनाथ शिंदे यांचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘एकनाथ शिंदे आदिपुरुषात आहेत हे माहित नव्हते.’ असं लिहिलं आहे. अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सनॉन आणि ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या सेलिब्रिटींचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.. पण एकनाथ शिंदे यांचा फोटो पोस्ट केल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एवढंच नाही तर, फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो अभय नावाच्या एका सोशल मीडिया युजरने पोस्ट केला आहे.. या ट्विटची माहिती ठाणे पोलिसांना मिळताच त्यांनी कारवाई केली. पोलिसांनी हे ट्विट करणाऱ्या अभय नावाच्या तरुणाचा फोन नंबर मागितला आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे..
पोलिसांनी फोन नंबर मागितल्यानंतर तरुणाने देखील पोलिसांना विचारलं, ‘काय झालं, नक्की प्रकरण काय आहे?’ या प्रकरणानंतर संबंधित तरुणावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अशात तरुणाच्या अडचणीत मोठी वाढ होवू शकते अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे..
हे ट्विट आक्षेपार्ह आहे असं म्हणत अनेक नेटकऱ्यांनी तरुणांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे तरुणीने ट्विट अद्याप डिलिट केलेलं नाही… आता या प्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.