Mahesh Babu: महेश बाबूसाठी हे वर्ष खूपच धक्कादायक; एका वर्षात गमावली जवळची तीन माणसं

महेश बाबूला वर्षभरात तिसरा मोठा धक्का; साऊथ सुपरस्टारवर कोसळला दु:खाचा डोंगर

Mahesh Babu: महेश बाबूसाठी हे वर्ष खूपच धक्कादायक; एका वर्षात गमावली जवळची तीन माणसं
Mahesh BabuImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 1:23 PM

हैदराबाद: तेलुगू चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार महेश बाबूसाठी 2022 हे वर्ष एखाद्या वाईट स्वप्नासारखंच आहे. या वर्षात त्याने आतापर्यंत कुटुंबातील तीन सदस्यांना गमावलं आहे. आधी मोठा भाऊ, त्यानंतर आई आणि आता महेश बाबूच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. जवळच्या व्यक्तीच्या निधनाचं दु:ख पचवणं खूप कठीण असतं. त्यातच हा धक्का वारंवार मिळाल्यास भावनिकदृष्ट्या माणूस खचतो. महेश बाबू आणि त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळल्याने चाहतेसुद्धा शोक व्यक्त करत आहेत.

सप्टेंबरमध्ये आईचं निधन

जवळपास दीड महिन्याआधी महेश बाबूने आईला गमावलं. 28 सप्टेंबर 2022 रोजी इंदिरा देवी यांचं निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. महेश बाबूचे वडील कृष्णा यांनी दोनदा लग्न केलं होतं. इंदिरा देवी यांना घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी दाक्षिणात्य अभिनेत्री निर्मलाशी लग्न केलं. घटस्फोटानंतर इंदिरा देवी एकट्याच राहत होत्या. महेश बाबू त्याच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून आईला भेटायला जात असत.

हे सुद्धा वाचा

वर्षाच्या सुरुवातीला मोठ्या भावाचं निधन

महेश बाबूची या वर्षाची सुरुवात पण वाईट वृत्ताने झाली. 8 जानेवारी रोजी महेश बाबूचा मोठा भाऊ रमेश बाबू यांचं निधन झालं. ते 56 वर्षांचे होते. दीर्घ आजारानंतर त्यांनी या जगाचा निरोप घेतला. भावाच्या निधनाच्या वेळी महेश बाबूला कोरोनाची लागण झाली होती. भावासाठी त्यांनी भावूक पोस्टसुद्धा लिहिली होती.

वडिलांचं निधन

भाऊ आणि आईच्या निधनाच्या झटक्यातून बाहेर येण्याआधीच महेश बाबूवर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला. सोमवारी महेश बाबूचे वडील कृष्णा यांना कार्डिॲक अरेस्टमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मंगळवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कृष्णा यांच्या निधनावर शोक व्यक्त करत असतानाच चाहत्यांनी महेश बाबू यांनाही आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.