Mahesh Babu: वडिलांच्या निधनानंतर महेश बाबूची अत्यंत भावूक पोस्ट; ‘याआधी मला कधीच असं..’

वडिलांच्या निधनाचं दु:ख पचवणं कठीण; साऊथ सुपरस्टार महेश बाबूची भावूक पोस्ट व्हायरल

Mahesh Babu: वडिलांच्या निधनानंतर महेश बाबूची अत्यंत भावूक पोस्ट; 'याआधी मला कधीच असं..'
महेश बाबूImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 25, 2022 | 7:52 AM

हैदराबाद: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार आणि अभिनेते महेश बाबू यांचे वडील कृष्णा यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. 15 नोव्हेंबर रोजी हैदराबादमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनानंतर आता महेश बाबूने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘तुमचा वारसा मी पुढे नेईन’ अशा शब्दांत महेशने भावना व्यक्त केल्या आहेत.

महेश बाबूची पोस्ट-

‘तुमचं आयुष्य जेवढं साजरं झालं, त्याहीपेक्षा जास्त तुमचं जाणं साजरं केलं गेलं. हीच तुमची महानता आहे. तुम्ही निर्भयपणे आयुष्य जगलात. धाडसी आणि धडाडी हा तुमचा स्वभाव होता. माझी प्रेरणा.. माझं धैर्य.. आणि मी ज्या गोष्टीकडे सतत पाहत आलोय, जे खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं ते एका झटक्यात असं निघून गेलंय. पण विशेष म्हणजे मला माझ्यात आता ही ताकद जाणवते जी मला आधी कधीच जाणवली नव्हती. आता मी निर्भय झालोय. तुमचा प्रकाश सदैव माझ्यात चमकत राहील. मी तुमचा वारसा पुढे नेईन. तुम्हाला माझा आणखी अभिमान वाटेल. लव्ह यू नान्ना.. माझे सुपरस्टार’, अशी पोस्ट महेश बाबूने लिहिली.

हे सुद्धा वाचा

महेश बाबूसाठी 2022 हे वर्ष एखाद्या वाईट स्वप्नासारखंच आहे. या वर्षात त्याने आतापर्यंत कुटुंबातील तीन सदस्यांना गमावलं आहे. आधी मोठा भाऊ, त्यानंतर आई आणि आता महेश बाबूच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. जवळच्या व्यक्तीच्या निधनाचं दु:ख पचवणं खूप कठीण असतं. त्यातच हा धक्का वारंवार मिळाल्यास भावनिकदृष्ट्या माणूस खचतो. महेश बाबू आणि त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळल्याने चाहतेसुद्धा शोक व्यक्त करत आहेत.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.