महिला आयोगाच्या पत्रानंतर मांजरेकरांची माघार, ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवला

Mahesh Manjarekar : अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा नवा सिनेमा 'वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा' या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावरून हटवण्यात आला आहे. या चित्रपटातील काही बोल्ड सीनमुळे हा चित्रपट वादात सापडला आहे.

महिला आयोगाच्या पत्रानंतर मांजरेकरांची माघार, 'वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवला
Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 3:43 PM

मुंबई : अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा नवा सिनेमा ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ (Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) प्रदर्शनाआधीच वादाच सापडला आहे. या चित्रपटातील काही बोल्ड सीनमुळे हा चित्रपट वादात सापडलाय. या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांमुळे महिला आयोगाने पत्र लिहून चित्रपटावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवण्यात आला आहे.

महेश मांजरेकारांचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात!

महेश मांजरेकरांचा ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या सिनेमाचा ट्रेलर १० जानेवारी रोजी युट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील काही सीनवरुन हा वाद सुरु झाला आहे. हेच आक्षेपार्ह सीन चित्रपटातून काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी महिला आयोगाने थेट पत्र लिहून केली. त्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर युट्यूबवरुन काढून टाकण्यात आला आहे.

चित्रपटात नेमकं काय?

ज्येष्ठ नाटककार, ज्यांचं नुकतंच निधन झालंय, त्या जयंत पवार यांनी लिहिलेल्या कथेवर हा सिनेमा आधारित आहे. हा सिनेमा मुंबईतील गिरणी कामगारांच्या आयुष्यावर असल्याची माहिती आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. उद्या म्हणजेच १४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

राज्य महिला आयोगाने पत्र लिहीत केली होती ट्रेलर हटवण्याची मागणी

‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट त्यातील बोल्ड सीनमुळे वादात सापडलाय. याची दखल राज्य महिला आयोगानेही घेतली. यातले बोल्ड सीन काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्राच्या माध्यमातून केली. आता हा ट्रेलर हटण्यात आला आहे.

महिला आयोगाने पत्रात काय म्हटलंय?

“वरण भात लोंचा, कोन नाय कोंचा” या चित्रपटाचा ट्रेलर फेसबुक, युट्युब, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दर्शकांसाठी वयाचे कोणतेही बंधन न ठेवता प्रसारित केला गेला आणि म्हणूनच अल्पवयीन मुलांसाठीही तो पाहण्यासाठी उपलब्ध आहे, जे निश्चित नियमापलीकडचं आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलांसाठी अशी लैंगिक दृश्ये उपलब्ध आहेत, याचा महिला आयोग निषेध करतो. अध्यक्षा श्रीमती रेखा शर्मा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांना या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करण्यासाठी आणि चित्रपटाचा ट्रेलर आणि लैंगिक दृश्ये सेन्सॉर करण्यासाठी पत्र लिहिलं.

संबंधित बातम्या

ब्रेकअपनंतर काहीच दिवसांत सुष्मिताने दत्तक घेतलं मुलं, तिन्ही मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

शिल्पा शेट्टी मुलगी समिशाला देतेय भूतदयेचे धडे, जखमी कावळा बघून शिल्पाच्या लेकीने जोडले हात

Video : अपघातानंतर पहिल्यांदाच समोर आला सहदेव दिरदो, ‘बचपन का प्यार’ फेम कलाकारानं काय म्हटलं, पाहा…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.