चाहत्यांनी असं काय केलं ज्यामुळे मलायका अरोरा संतापली? व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही कळेल प्रकरण

मलायका अरोरा हिला पाहताच चाहत्यांनी असं काय केलं ज्यामुळे भडकली अभिनेत्री; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण... सोशल मीडियावर मलायकाच्या व्हिडीओवर चाहते कमेंत करत म्हणाले...

चाहत्यांनी असं काय केलं ज्यामुळे मलायका अरोरा संतापली? व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही कळेल प्रकरण
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 10:51 AM

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. एवढंच नाही तर, मलायकाला पाहिल्यानंतर तिची एक झलक पाहण्यासाठी आणि तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहते एकच गर्दी करतात. आता देखील असंच काही झालं. मलायकाला पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांची गर्दी तिच्या भोवती जमली. तिच्या पाहताच अनेकांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये अभिनेत्रीसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला. फोटो काढत असताना काही चाहते मलायकाच्या जवळ आल्यामुळे अभिनेत्री संतापली.

सेलिब्रिटी अनेकदा विमानताळावर स्पॉट होतात. म्हणून सेलिब्रिटींना पाहिल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमते. या गर्दीमध्ये सेलिब्रिटी चाहत्यांसोबत फोटो काढतात, त्यांच्यासोबत गप्पा देखील मारतात. पण काही वेळा चाहत्यांचा उत्साह सेलिब्रिटींसाठी त्रासदायक ठरतो. ज्यामुळे सेलिब्रिटी संतापतात.

हे सुद्धा वाचा

मलायका हिच्यासोबत देखील असंच काही झालं आहे. मलायकाला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. विमानतळावर मलायका असल्यामुळे तिला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी जमली. तिच्यासोबत अनेकांना फोटो काढायचा होता. पण काही चाहते फोटो काढण्यासाठी अभिनेत्रीच्या अगदी जवळ आल्यांमुळे मलायका संतापली आणि म्हणाली, ‘आराम से..’, चाहत्यांच्या अशा वागणुकीमुळे मलायका रागावली आणि निघून गेली. सध्या याप्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मलायकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जण अभिनेत्रीची बाजू मांडत आहेत, तर अनेकांनी मलायकाचा विरोध केला. मलायकाच्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत स्वतःचं मत व्यक्त करत आहेत. सध्या सर्वत्र मलायकाच्या व्हिडीओची चर्चा रंगताना दिसत आहे.

मलायका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. मलायका बॉयफ्रेंड आणि अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत देखील फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करत असते. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मलायका आणि अर्जुन एकत्र दिसतात. अर्जुन देखील मलायकावर असलेलं प्रेम व्यक्त करत अभिनेत्रीसोबत फोटो पोस्ट करत असतो.

अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याच्या चर्चा रंगू लागल्या. महत्त्वाचं म्हणजे अर्जुन आणि मलायका यांनी त्यांच्या नात्याची कबुली सर्वांसमोर दिली आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये देखील दोघे त्यांच्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसतात.

जेव्हा अर्जुन आणि मलायका यांनी त्यांच्या नात्याची कबुली सर्वांसमोर दिली तेव्हा अनेकांनी टीका केली. पण अर्जुन आणि मलायका कोणत्याही गोष्टीला अधिक महत्त्व न देता फक्त आणि फक्त त्यांच्या भावनांना महत्त्व दिलं. आता दोघे अनेकांना कपल गोल्स देतात.

भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.