मलायका-अरबाजचा एकमेकांना मिठी मारतानाचा Video व्हायरल; ट्रोल न करता नेटकऱ्यांनी केलं कौतुक
अनेकदा मलायकाला घटस्फोटानंतर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र पहिल्यांदाच या दोघांचा मिठी मारतानाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरीसुद्धा कौतुक करत आहेत. नेटकऱ्यांनी कौतुक करण्यामागचं कारणही तसंच आहे.
मुंबई: अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान हे विभक्त झाले असले तरी घटस्फोटानंतर दोघांची मैत्री कायम आहे. मुलगा अरहान खानसाठी हे दोघं नेहमीच एकत्र येतात. अरहान सध्या परदेशात शिक्षण घेत आहे. तो मुंबईत आल्यानंतर किंवा मुंबईतून परदेशात रवाना होताना अरबाज आणि मलायका नेहमीच एअरपोर्टवर एकत्र दिसतात. या तिघांचा व्हिडीओसुद्धा अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता पुन्हा एकदा ही जोडी मुंबई एअरपोर्टवर एकत्र दिसली. मात्र यावेळी दोघांचाही अंदाज वेगळा होता. कारण यावेळी मलायका आणि अरबाज यांच्यातील सुंदर बाँडिंग या व्हिडीओत पहायला मिळतेय.
मुलाला निरोप दिल्यानंतर मलायका आणि अरबाज एकमेकांना मिठी मारताना या व्हिडीओत दिसले. त्यानंतर दोघं आपापल्या मार्गी निघून गेले. अनेकदा मलायकाला घटस्फोटानंतर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र पहिल्यांदाच या दोघांचा मिठी मारतानाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरीसुद्धा कौतुक करत आहेत. नेटकऱ्यांनी कौतुक करण्यामागचं कारणही तसंच आहे.
‘यालाच को-पॅरेंटिंग म्हणतात. दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत आणि दोघांनाही एकमेकांच्या खासगी आयुष्याविषयी आदर आहे. मात्र तरीही मुलासाठी ते नेहमी एकत्र येतात’, अशा शब्दांत एका युजरने कौतुक केलं आहे. तर ‘ज्यांना टीका करायची आहे त्यांनी खुशाल टीका करावी, मात्र हे दोघं खूप चांगले पालक आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
View this post on Instagram
‘प्रत्येक नातं हे भांडण आणि एकमेकांचा अनादर करूनच संपलं पाहिजे हे गरजेचं नाही. एकमेकांच्या समजुतदारपणानेही नाती संपवता येतात आणि त्यानंतर एकमेकांचा आदरही करता येतो’, असंही एकाने लिहिलं आहे.
घटस्फोटानंतर अरबाजसोबतचं नातं कसं आहे, असा प्रश्न मलायकाला तिच्या शोमध्ये करण जोहरने विचारला होता. त्यावर ती म्हणाली होती, “मला वाटतं की आमच्यात चांगलं समीकरण आहे. पहिल्यापेक्षा आता आम्ही एकमेकांशी चांगले वागू लागलो आहोत.”
मलायका आणि अरबाजने 2017 मध्ये घटस्फोट घेतला. सध्या मलायका ही अभिनेता अर्जुन कपूरला डेट करतेय. तर अरबाजचं नाव मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीशी जोडलं गेलं आहे.