AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malaika Arora: मुलाकडून अरबाजच्या खासगी आयुष्याचे अपडेट्स घेते मलायका? शोमध्ये म्हणाली..

अरबाजच्या खासगी आयुष्याबद्दल विचारताच करण जोहरला मलायका म्हणाली..

Malaika Arora: मुलाकडून अरबाजच्या खासगी आयुष्याचे अपडेट्स घेते मलायका? शोमध्ये म्हणाली..
अरबाज-जॉर्जियाच्या ब्रेकअपच्या चर्चांवर मलायकाची प्रतिक्रियाImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 13, 2022 | 10:14 AM
Share

मुंबई: अभिनेत्री मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज खान हा मॉडेल जॉर्जिया अँडियानीला डेट करतोय. मात्र या दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत. अरबाज किंवा जॉर्जियाने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आता अरबाजची पूर्वाश्रमीची पत्नी मलायकाला या ब्रेकअपबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या तिच्या नव्या शोमध्ये करण जोहरने हजेरी लावली होती. करणने यावेळी मलायकाला अरबाजच्या ब्रेकअपविषयी प्रश्न विचारला.

अरबाजसोबतचं मलायकाचं नातं

घटस्फोटानंतर अरबाजसोबतचं नातं कसं आहे, असा प्रश्न आधी करणने विचारला. त्यावर मलायका म्हणाली, “मला वाटतं की आमच्यात चांगलं समीकरण आहे. पहिल्यापेक्षा आता आम्ही एकमेकांशी चांगले वागू लागलो आहोत.”

अरबाज-जॉर्जियाच्या ब्रेकअपबद्दल काय म्हणाली मलायका?

“जेव्हा नुकताच अरबाजचा ब्रेकअप झाला तेव्हा तू त्याच्याशी याबद्दल बोललीस का”, असा प्रश्न करणने मलायकाला विचारला. त्यावर उत्तर देताना मलायका म्हणाली, “प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर मी हे सर्व प्रश्न विचारत नाही. मी तर माझ्या मुलाच्याही आयुष्यात काय चाललंय, याबद्दल प्रश्न विचारत नाही. मला हे आवडत नाही. मी माझी मर्यादा ओलांडतेय असं मला वाटतं. मला माहितीये की असे अनेक कपल्स असतात जे घटस्फोटानंतरही मुलांकडून एक-दुसऱ्याच्या आयुष्यातील गोष्टींचे अपडेट घेत असतात. मात्र मी त्यापैकी नाही. मी अशा सर्व गोष्टींपासून दूर राहणं पसंत करते.”

आपल्या या नव्या शोमध्ये मलायका तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. लग्न, अरबाजला घटस्फोट देण्यामागचं कारण, अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपबद्दल झालेली ट्रोलिंग याविषयी ती उघडपणे व्यक्त झाली.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.