AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malaika Arora | “आमच्यातील प्रेम अजूनही..”; अरबाज खानबद्दल मलायकाचं वक्तव्य ऐकून उंचावल्या भुवया

मलायकाने 2017 मध्ये अरबाज खानला घटस्फोट दिला. या दोघांना 20 वर्षांचा अरहान हा मुलगा आहे. विभक्त झाल्यानंतरही मुलासाठी या दोघांना नेहमीच एकत्र आल्याचं पाहिलं गेलं. या दोघांनी 1998 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या 19 वर्षांनंतर 2017 मध्ये अरबाज आणि मलायका विभक्त झाले.

Malaika Arora | आमच्यातील प्रेम अजूनही..; अरबाज खानबद्दल मलायकाचं वक्तव्य ऐकून उंचावल्या भुवया
Malaika Arora and Arbaaz KhanImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 19, 2023 | 10:41 AM
Share

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान हे एकेकाळी बॉलिवूडमधील ‘पॉवर कपल’ म्हणून ओळखले जायचे. या दोघांनी 1998 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या 19 वर्षांनंतर 2017 मध्ये अरबाज आणि मलायका विभक्त झाले. या दोघांना अरहान हा मुलगा आहे. अरहान परदेशात शिक्षण घेत असून त्याच्यासाठी नेहमीच अरबाज-मलायका एकत्र येताना दिसतात. घटस्फोटानंतरही मुलाच्या संगोपनाची जबाबदारी नीट पार पडण्यासाठी दोघंही प्रयत्न करताना दिसतात. याविषयी मलायका नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली.

सह-पालकत्वाचं आव्हान

घटस्फोटानंतर सह-पालकत्वाची जबाबदारी पार पाडणं खूप कठीण असल्याचंही मलायकाने यावेळी सांगितलं. अनेकदा एकाच मताशी दोघं सहमत नसतात आणि त्यामुळेच ही जबाबदारी पार पाडताना बऱ्याच अडथळ्यांचा सामना करावा लागतो, असं मलायका म्हणाली. मलायकाने ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव’ला हजेरी लावली होती. या मुलाखतीत तिला अरहान आणि सह-पालकत्वातील आव्हानांविषयी प्रश्न विचारला गेला.

अरबाजबद्दल काय म्हणाली मलायका?

“सह-पालकत्व नेहमीच कठीण असतं. आपण बऱ्याच गोष्टींबद्दल एकमत नसतो. विशेषत: जेव्हा तुम्ही दोघं तुमच्या वेगळ्या मार्गाने जाता, तेव्हा नेहमी असं काहीतरी असतं जे एकाच चित्रात बसत नाही. पण सुदैवाने, अरबाज आणि माझ्यात आज खूप चांगलं नातं आहे. आम्ही दोघं आता व्यक्ती म्हणून खूप चांगले आहोत. आम्ही दोघं मिळून मुलाचा सांभाळ करू शकतो, यावर आम्हाला अभिमान आहे. सुदैवाने आमच्यातील प्रेम अजूनही नाहीसं झालं नाही. त्यामुळे आमच्या मुलाला जे हवंय, ज्यावर त्याचा हक्क आहे, ते सर्व आम्ही त्याला देऊ शकतोय”, असं मलायका म्हणाली.

का घेतला घटस्फोट?

घटस्फोटानंतर जरी पती-पत्नी राहिले नसले तरी मुलाच्या प्रत्येक पावलावर आम्ही दोघं त्याच्यासोबत आहोत, असंही तिने सांगितलं. “आम्ही एकत्र आहोत आणि माझ्या मते तेच महत्त्वाचं असतं”, असं मत तिने व्यक्त केलं. यावेळी मलायकाला तिच्या घटस्फोटाविषयीही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने सांगितलं, “मी खूप तरुण होते. मी सुद्धा बदलले. मला माझ्या आयुष्यात काही वेगळ्या गोष्टी हव्या होत्या आणि माझ्या मते आम्ही आता व्यक्ती म्हणून खूप चांगले आहोत.”

मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करतेय. तर अरबाज हा मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मलायकाचा ‘मूव्हींग इन विथ मलायका’ हा शो काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर अरबाजनेही ‘द इनविन्सिबल’ हा शो होस्ट केला होता.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.