अर्जुनसोबत ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान मलायका म्हणते, ‘दोनदा करा अन्..’

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अभिनेत्री मलायका अरोराने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. मलायकाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये ही पोस्ट शेअर केली आहे. 'जेव्हा ते म्हणतात की तुम्ही हे करू शकत नाही, तेव्हा ते दोनदा करा आणि फोटो क्लिक करा,' अशी ही पोस्ट आहे.

अर्जुनसोबत ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान मलायका म्हणते, 'दोनदा करा अन्..'
Arjun Kapoor and Malaika Arora Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 03, 2024 | 11:28 AM

सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा आहे. मलायका आणि अर्जुनचे मार्ग वेगळे असून ते आता एकमेकांना डेट करणार नाहीत, अशी ही चर्चा आहे. एकीकडे मलायकाच्या मॅनेजरने या चर्चा फेटाळल्या आहेत. तर दुसरीकडे अर्जुन आणि मलायका मात्र इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये विविध पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. अर्जुन कपूरनंतर आता मलायकानेही तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने तिच्या नात्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिल्याचं समजतंय.

काय आहे मलायकाची पोस्ट?

‘जेव्हा ते म्हणतात की तुम्ही हे करू शकत नाही, तेव्हा ते दोनदा करा आणि फोटो क्लिक करा,’ अशा आशयाची ही पोस्ट आहे. शनिवारी अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. ‘आपल्याकडे आयुष्यात दोन पर्याय असतात. आपण आपल्या भूतकाळाचे कैदी होऊ शकतो किंवा भविष्यातील शक्यतांचा शोध घेणारे बनू शकतो’, अशी ही पोस्ट होती. मलायका आणि अर्जुनने 2018 मध्ये त्यांच्या नात्याला जाहीरपणे कबुली दिली होती. मलायकाच्या 45 व्या वाढदिवशी सोशल मीडियावर पोस्ट लिहित अर्जुनने प्रेम व्यक्त केलं होतं.

हे सुद्धा वाचा

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मलायकाच्या मॅनेजरने सांगितलं होतं, “नाही नाही, या सर्व केवळ चर्चा आहे. त्या दोघांचं ब्रेकअप झालेल नाही.” मलायका आणि अर्जुनच्या जवळच्या व्यक्तीने एका मुलाखतीत त्यांच्या ब्रेकअपचा खुलासा केला होता. तेव्हापासून या दोघांच्या नात्याविषयी चर्चांना उधाण आलं होतं. ‘मलायका आणि अर्जुन यांचे मार्ग जरी वेगळे झाले तरी ते याबाबत एकमेकांवर कधीच आरोप करणार नाहीत. ते त्यांच्या नात्याचा कायम आदर करतील’, असं त्या जवळच्या व्यक्तीने ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

19 वर्षांच्या संसारानंतर मलायका आणि अरबाज यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. या दोघांना अरहान हा मुलगा आहे. अर्जुनसोबतच्या नात्यामुळे मलायका अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता दोघं एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत असतानाच मलायकाने एका मुलाखतीत हेसुद्धा स्पष्ट केलं की त्यांनी तिच्या गप्प राहण्याचा गैरफायदा घेऊ नये. “मला एका विशिष्ट टप्प्यापर्यंत गप्प राहायला आवडतं, कारण तो पर्याय मी स्वत: निवडते. मला ती अधिकची चर्चा नको असते, किंवा आवडत नाही. पण त्याचा कोणी गैरफायदा घेऊ नये”, असं ती पुढे म्हणाली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.