धक्कादायक… वयाच्या 24 व्या वर्षी अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचं कारण थक्क करणारं
परदेशात 24 वर्षीय अभिनेत्री हृदयद्रावक निधन, मृत्यूचं कारण थक्क करणारं, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या निधनाची चर्चा... अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख केलं व्यक्त...
मुंबई | 9 डिसेंबर 2023 : ‘सीआयडी’ फेम अभिनेता दिनेश फडणीस, विनोदवीर अभिनेते ज्युनियर महमूद (Junior Mehmood) यांच्या निधनाची बातमी ताजी असताना आणखी एका अभिनेत्रीच्या निधनाची माहिती समोर येत आहे. एका 24 वर्षीय अभिनेत्रीचं निधन झालं आहे. परदेशात अभिनेत्रीचं निधन झाल्यामुळे खळबळ माजली आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीच्या निधनाचं धक्कादायक कारण देखील समोर आलं आहे. अभिनेत्रीच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या निधनाची चर्चा रंगली आहे.
मल्याळम सिनेसृष्टीतील अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन हिने वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. शुक्रवारी संयुक्त अरब अमिराती येथील शारजाहमध्ये लक्ष्मीका सजीवन हिचं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीका हिचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने दाक्षिणात्य सिनेविश्वात स्वतःचं स्थान पक्क केलं होतं. पण अभिनेत्रीला स्वतःचं स्वप्न पूर्ण करता आले नाही. सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय होती. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. लक्ष्मीका सजीवन कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करायची.
अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन हिचे सिनेमे
अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. लक्ष्मीका सजीवन हिने ‘पुझायम्मा’, ‘पंचवर्नाथथा’, ‘सऊदी वेल्लक्का’, ‘उयारे’, ‘ओरु कुट्टनाडन ब्लॉग’, ‘ओरु यमंदन प्रेमकथा’ आणि ‘नित्यहरिथा नायगन’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन हिच्या निधनानंतर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत. तर लक्ष्मीका सजीवन हिचं वयाच्या 24 व्या वर्षी निधन झाल्यामुळे कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे.