प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचारादरम्यान गमावले प्राण

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार कुंद्रा जॉनी यांचं वयाच्या 71 व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कुंद्रा जॉनी यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचारादरम्यान गमावले प्राण
Kundara JohnyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 1:49 PM

केरळ : 18 ऑक्टोबर 2023 | मल्याळम चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवलेले अभिनेते कुंद्रा जॉनी यांचं मंगळवारी निधन झालं. केरळमधल्या कोल्लम इथल्या एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 71 वर्षांचे होते. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गॉडफादर’ या चित्रपटातील त्यांची भूमिका खूप गाजली होती. त्यांच्या पार्थिवावर कधी आणि कुठे अंत्यसंस्कार करण्यात येतील, याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही. ‘फिल्म इम्प्लॉइज फेडरेशन ऑफ केरळ’ने (FRFKA) फेसबुकवर पोस्ट लिहित कुंद्रा जॉनी यांच्या निधनाची माहिती दिली. मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांनी प्राण गमावलं.

500 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका

केरळचे अर्थमंत्री केएन बालगोपाल यांनी श्रद्धांजली वाहताना लिहिलं, ‘कुंद्रा जॉनी यांनी त्यांच्या चार दशकाच्या करिअरमध्ये 500 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या निधनाने मल्याळम चित्रपटसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे.’ मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील इतर सेलिब्रिटींकडूनही सोशल मीडियाद्वारे कुंद्रा यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

‘किरीदम’मधील भूमिका गाजली

कुंद्रा जॉनी यांनी 1979 मध्ये ‘नित्या वसंतम’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी खलनायकी भूमिका साकारून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘किरीदम’ आणि ‘चेनकोल’ या चित्रपटांमधील त्यांच्या कामाचं विशेष कौतुक झालं होतं. याशिवाय त्यांनी ‘वाजकई चक्रम’ आणि ‘नदीगन’ यांसारख्या तमिळ चित्रपटांमध्येही काम केलं होतं.

मोहनलाल यांच्या ‘किरीदम’ या चित्रपटात कुंद्रा जॉनी यांनी परमेश्वरनची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचं प्रेक्षक-समिक्षकांकडून खूप कौतुक झालं होतं. त्यांच्या इतर काही दमदार चित्रपटांमध्ये ’15 ऑगस्ट’, ‘हॅलो’, ‘अवन चंडीयुडे माकन’, ‘भार्गवचरितम मुन्नम खंडम’, ‘बलराम बनाम थरादास’, ‘भारत चंद्रन आईपीएस’, ‘दादा साहेब’, ‘क्राइम फाइल’ यांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.