Mammootty: केसांवर टिप्पणी केल्याने ममूटी यांच्यावर टीका; मागावी लागली माफी

प्रसिद्ध अभिनेत्याला केसांवर टिप्पणी करणं पडलं महागात; अखेर मागितली जाहीर माफी

Mammootty: केसांवर टिप्पणी केल्याने ममूटी यांच्यावर टीका; मागावी लागली माफी
MammoottyImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 3:33 PM

केरळ: मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते ममूटी हे त्यांच्या एका टिप्पणीमुळे वादात सापडले आहेत. दिग्दर्शक जूड अँथनी जोसेफ यांच्यावर त्यांनी टिप्पणी केली होती. या टिप्पणीनंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर बरीच टीका झाली. ममूटीने बॉडी शेमिंग केल्याची टीका नेटकऱ्यांनी केली. नेटकऱ्यांची ही नाराजी पाहिल्यानंतर ममूटी यांनी फेसबुक पेजवर पोस्ट लिहित माफी मागितली.

जोसेफ यांनी खुद्द ममूटी यांची बाजू घेत त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं म्हणाले. त्यामुळे त्यांच्यावर टीका करू नका, अशी विनंती त्यांनी नेटकऱ्यांना केली.

2018 या जोसेफ यांच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान ममूटी म्हणाले, “जूड अँथनी जोसेफ यांच्या डोक्यावर फार केस नसले तरी माणूस म्हणून हुशार आहे.” ममूटी यांनी त्यांच्या कामाचं कौतुक करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यासाठी केलेली शब्दांची निवड योग्य नव्हती, असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

हे सुद्धा वाचा

जोसेफ यांचं कौतुक करताना उत्साहाच्या भरात मी जे काही बोललो त्यामुळे मी माफी मागतो. भविष्यात पुन्हा कधी अशी टिप्पणी करणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

जोसेफ यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित ममूटी यांची साथ दिली. ‘माझ्या डोक्यावर केस नाहीत म्हणून मी किंवा माझे कुटुंबीय दु:खी नाहीत. जर लोकांना माझ्या केसांची इतकीच काळजी असेल तर त्यांनी शाम्पू कंपन्या आणि बेंगळुरू कॉर्पोरेशनच्या पाण्याविरोधात आवाज उठवावा’, असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.