Manipur | मणिपूरमधील धक्कादायक घटनेवर आशुतोष राणा यांची पोस्ट चर्चेत; ‘इतिहास साक्षी आहे की..’

बुधवारी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यावरून चांगलाच गदारोळ झाला. या प्रकरणातील एका आरोपीला गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरच्या व्हायरल व्हिडीओवरून केंद्र आणि राज्य सरकारला फटकारलं आहे.

Manipur | मणिपूरमधील धक्कादायक घटनेवर आशुतोष राणा यांची पोस्ट चर्चेत; 'इतिहास साक्षी आहे की..'
Ashutosh RanaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 4:42 PM

मुंबई | 20 जुलै 2023 : मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराने संपूर्ण देश हादरलं आहे. सर्व स्तरांतून या घटनेवर तीव्र निषेध व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेते आशुतोष राणा यांनी मणिपूरमधील घटनेसंदर्भात केलेलं ट्विट सध्या चर्चेत आलं आहे. ती घटना ही संपूर्ण मानवतेला कलंक असल्याचं त्यांनी म्हटलंय. मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून रस्त्यावर धिंड काढल्याचा हा व्हिडीओ समोर आला आहे. या महिलांवर लैंगिक अत्याचारसुद्धा करण्यात आला होता.हा व्हिडीओ 4 मे रोजी घडलेल्या घटनेचा आहे. ज्यात पोलिसांनी याआधीच एफआयआर दाखल केला होता. मात्र आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नव्हती.

आशुतोष राणा यांचं ट्विट-

‘इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा कोणत्याही अत्याचार करणाऱ्याने एखाद्या स्त्रीचे अपहरण केलं किंवा लैंगिक वस्त्रहरण केलं तेव्हा संपूर्ण मानवजातीला त्याची किंमत चुकवावी लागली. ज्याप्रमाणे सत्य, तप, पवित्रता आणि दान हे धर्माचे चार स्तंभ आहेत. त्याचप्रमाणे विधिमंडळ, प्रशासन, न्यायपालिका आणि पत्रकारिता हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. लोकशाहीच्या या चारही स्तंभांना एकमेकांशी एकरूप होऊन वाटचाल करावी लागेल, तरच ते अमानुष कृत्यांच्या नरसंहारातून जनतेची सुटका करू शकतील’, असं त्यांनी लिहिलं.

हे सुद्धा वाचा

‘आता वेळ आली आहे की सर्व राजकीय पक्ष आणि राजकारणी, मीडिया हाऊस आणि मीडिया कर्मचाऱ्यांना आपापसातील मतभेद आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं विसरून राष्ट्रहितासाठी एकत्रित प्रयत्न करावे लागतील. कारण हे राष्ट्र सर्वांचं आहे. सर्व पक्ष आणि राजकीय पक्ष देश आणि देशवासियांचं संरक्षण, पालनपोषण आणि समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध आहेत. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्त्रीचं शोषण, तिच्यावरील अत्याचार, तिचा अपमान.. हे अर्ध्या मानवतेवर नसून संपूर्ण मानवतेला कलंक आहे’, अशा शब्दांत त्यांनी आवाहन केलं आहे.

बुधवारी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यावरून चांगलाच गदारोळ झाला. या प्रकरणातील एका आरोपीला गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरच्या व्हायरल व्हिडीओवरून केंद्र आणि राज्य सरकारला फटकारलं आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले, “हे मान्य नाही. जे व्हिडीओ समोर आले आहेत ते अत्यंत चिंताजनक आहेत. याप्रकरणी मे महिन्यातच कारवाई व्हायला हवी होती. अशा मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.”

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.