Manisha Koirala | अनेक वर्षांनंतर मनिषाने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण; अनेकांसाठी मोठा धडा

विवाहित असल्याचा टॅग मिळवण्यासाठी लग्न करताय? उत्सुकतेने लग्न केल्यानंतर मनिषाच्या आयुष्यात आलेले धक्कादायक प्रसंग... अखेर अभिनेत्री सोडलं मौन, दिला मोठा सल्ला

Manisha Koirala | अनेक वर्षांनंतर मनिषाने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण; अनेकांसाठी मोठा धडा
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 11:40 AM

मुंबई | अभिनेत्री मनिषा कोईराला हिचं बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसोबत नाव जोडण्यात आलं. पण कोणासोबतही अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. आयुष्यात कायम आपल्याला साथ देणारा जोडीदार हवा म्हणून अभिनेत्रीने नेपाळचे उद्योगपती सम्राट दहालसोबत केलं. 19 जून 2010 साली त्यांनी लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही… त्यानंतर 2 वर्षांनंतर 2012 रोजी दोघे विभक्त झाले. लग्नाच्या सहा महिन्यानंतर दोघांच्या नात्यात वादाची ठिणगी पेटू लागली.. लग्नाच्या सहा महिन्यात दोघांमध्ये मतभेद होवू लागले.. अभिनेत्रीच्या लग्नाने आणि त्यानंतर घटस्फोटाने चाहत्यांना मोठा धक्का बसला. आयुष्यात आलेल्या संकटांचा सामना करताना अभिनेत्री पूर्णपणे खचली होती. अखेर एका मुलाखतीत मनिषाने घटस्फोटाचं कारण सांगितलच…

प्रेमाच्या आधारावर सुरु झालेल्या नात्याचा अंत इतक्या वाईट प्रकारे होईल याचा विचार देखील अभिनेत्रीने केला नव्हता.. एका मुलाखतीत अभिनेत्रीने घटस्फोटाबद्दल मौन सोडलं.. मनिषा म्हणाली, ‘झालेल्या गोष्टीची मी पूर्णपणे जबाबदारी घेते. मी लग्नासाठी घाई केली आणि नंतर मला कळालं मी या व्यक्तीसाठी बनली नाहीये.. समोरच्या व्यक्तीची काहीही चूक नाहीये… पूर्ण चूक माझी होती हे मी मान्य करते…’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘लग्न करणं माझ्यासाठी एका स्वप्नासारखं होतं.. पण जर तुम्ही एका वाईट नात्यात आहात, तर विभक्त होणं हाच एक पर्याय आहे…’ एवढंच नाही तर, घटस्फोटानंतर जोडीदाराबद्दल मनात कोणतेही मतभेद नाहीत… असं देखील अभिनेत्री म्हणाली. सम्राट दहाल याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीने कधीही लग्न केलं नाही. आज अभिनेत्री एकटं आयुष्य जगत आहे..

आयुष्यात जे काही झालं ते माझ्यासाठी आणि इतरांसाठी मोठी धडा आहे… असं देखील अभिनेत्री म्हणाली.. लग्न म्हणजे आयुष्यातील फार मोठा टप्पा असतो. लग्नानंतर अनेक गोष्टी बदलत असतात. जीवनात अनेक बदल होतात. विवाहित असल्याचा टॅग मिळवण्यासाठी अनेक जण गर्लफ्रेंड / बॉयफ्रेंडसोबत लग्न करतात. पण विसरतात की लग्न एक मोठी जबाबदारी असते.. कोणत्याही गोष्टीची काळजी न करता फक्त उत्सुकता आणि घाईत झालेल्या लग्नात पुढे अनेक अडचणी निर्माण होतात..

फक्त मनिषा कोईरालाच नाही तर, बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री आज एकटं आयुष्य जगतात. अभिनेत्रींच्या आयुष्यात कधी प्रेमाची एन्ट्री झालीच नाही.. असं काहीही नाही. पण अभिनेत्रींचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. पैसा, प्रसिद्धी संपत्ती सर्वकाही असताना बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री त्यांच्या आयु्ष्यात आनंदी आहेत..

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.