Manisha Koirala | ‘तुला असं पाहून वाईट वाटतंय’; मनीषा कोईरालाच्या व्हिडीओवर चाहत्यांचे कमेंट्स

2012 मध्ये कॅन्सरचं निदान झाल्यानंतर मनीषाने अभिनयातून ब्रेक घेतला. कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केल्यानंतर 2017 मध्ये तिने 'डिअर माया' या चित्रपटातून पुनरागमन केलं. त्याच्या पुढच्या वर्षी मनीषाने नेटफ्लिक्सवरील 'लस्ट स्टोरीज' या अँथॉलॉजी चित्रपटातील एका कथेत भूमिका साकारली.

Manisha Koirala | 'तुला असं पाहून वाईट वाटतंय'; मनीषा कोईरालाच्या व्हिडीओवर चाहत्यांचे कमेंट्स
Manisha KoiralaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 17, 2023 | 2:12 PM

मुंबई | 17 जुलै 2023 : एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या कलाकारांना त्यांच्या उतारवयात जेव्हा पाहिलं जातं, तेव्हा चाहत्यांना अनेकदा वाईट वाटतं. बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री मनीषा कोईरालाला रविवारी मुंबई एअरपोर्टवर पाहिलं गेलं. बऱ्याच काळानंतर मनीषाला सार्वजनिक ठिकाणी पाहिलं गेलं होतं. यावेळी पापाराझींनी तिचा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. मनीषाचं अत्यंत साधं राहणीमान आणि चेहऱ्यावरील दिलखुलास हास्य पाहून पापाराझी खुश झाले. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

निळ्या रंगाचा टॉप, पँट आणि त्यावर जॅकेट असा मनीषाचा लूक होता. तिने केस वर बांधले होते. कारमधून बाहेर पडताच तिने पापाराझींसमोर हसत फोटोसाठी पोझ दिले. ‘बॉलिवूडमधील एकमेव नॅच्युरल ब्युटी’, असं एकाने लिहिलं. तर ‘मनीषा आतासुद्धा तितकीच सुंदर आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. तर काहींनी मनीषाला असं उतारवयात पाहून वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली. किंबहुना हेच प्रत्येकाच्या आयुष्याच्या सत्य असून मनमोकळेपणे जीवन जगा, असंही काहींनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

मनीषाने 1989 मध्ये ‘फेरी भेटौला’ या नेपाळी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 1991 मध्ये तिने ‘सौदागर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘1942 : अ लव्ह स्टोरी’ आणि ‘बॉम्बे’ या चित्रपटांच्या यशानंतर तिला प्रसिद्धी मिळाली. मनीषाने त्यानंतर अग्निसाक्षी, इंडियन, गुप्त : द हिडन ट्रुथ, कच्चे धागे, मुधलवन, कंपनी, एक छोटीसी लव्ह स्टोरी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.

2012 मध्ये कॅन्सरचं निदान झाल्यानंतर मनीषाने अभिनयातून ब्रेक घेतला. कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केल्यानंतर 2017 मध्ये तिने ‘डिअर माया’ या चित्रपटातून पुनरागमन केलं. त्याच्या पुढच्या वर्षी मनीषाने नेटफ्लिक्सवरील ‘लस्ट स्टोरीज’ या अँथॉलॉजी चित्रपटातील एका कथेत भूमिका साकारली. रणबीर कपूरच्या ‘संजू’ या चित्रपटात तिने नरगिस यांची भूमिका साकारली होती. नुकतीच ती कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’ या चित्रपटात झळकली. या चित्रपटात तिने कार्तिकच्या आईची भूमिका साकारली होती.

धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.