बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच प्रियांका चोप्राच्या बहिणीचा अंकिता लोखंडेला टोमणा

'बिग बॉस 17' हा शो अखेर संपला असून स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने बाजी मारली. तर मन्नारा चोप्रा ही तिसऱ्या स्थानी आणि अंकिता लोखंडे चौथ्या स्थानी होती. बिग बॉसच्या घरात असताना या दोघींचं कधीच एकमेंकीशी पटलं नव्हतं. आता घराबाहेर पडल्यानंतर मन्नाराने अंकितावर निशाणा साधला आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच प्रियांका चोप्राच्या बहिणीचा अंकिता लोखंडेला टोमणा
Mannara Chopra and Ankita LokhandeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 29, 2024 | 12:07 PM

मुंबई : 29 जानेवारी 2024 | स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने ‘बिग बॉस 17’ची ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. रविवारी 28 जानेवारी रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडला. या फिनालेमध्ये त्याने अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे आणि अरुण माशेट्टी यांना मागे टाकलं होतं. त्यापैकी मन्नारा ही बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्रा यांची चुलत बहीण आहे. बिग बॉसच्या घरात मन्नारा आणि अंकिता यांचं एकमेकींशी कधीच पटलं नव्हतं. त्यामुळे मन्नाराने जेव्हा बाहेर आल्यानंतर अंकिताविषयी प्रतिक्रिया दिली, तेव्हा त्याची जोरदार चर्चा झाली.

बिग बॉसच्या घराबाहेर माध्यमांशी बोलताना मन्नारा म्हणाली, “अंकिता खूप चांगली खेळली. ती तर बिग बॉसची चाहती आहे. त्यामुळे गेम कसा खेळायचा हे तिला चांगल्या पद्धतीने माहीत होतं. मात्र बिग बॉसच्या घरात ती पती विकी जैनसोबत आली होती. पतीसोबत गेममध्ये येऊनसुद्धा ती घरात एकटी पडली होती. मी तर संपूर्ण खेळ एकटीनेच खेळला आहे. हे तीन महिने खूप मजेशीर होते. बिग बॉसच्या घरात मी खूप मज्जा केली. माझ्यासाठी हे सर्व एखाद्या हॉलिडेसारखंच होतं. अंकिताला मी चांगली टक्कर दिली. तिलाही माझ्याकडून शुभेच्छा देते.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Mannara❤️ (@memannara)

ऑक्टोबर महिन्यात जेव्हा बिग बॉसचा सतरावा सिझन सुरू झाला, तेव्हा अंकिता लोखंडेनं पती विकी जैनसोबत स्पर्धक म्हणून सहभाग घेतला. मात्र बिग बॉसच्या घरात या दोघांमध्येच अनेकदा खटके उडाले. ज्याचा फायदा इतर स्पर्धकांना खेळात पुढे जाण्यासाठी उचलता आला. विकी आणि अंकिता यांच्यात सतत भांडणं झाली. तर दुसरीकडे अंकिताचं मन्नाराशी कधी पटलं नव्हतं. पतीसोबत येऊनही अंकिता घरात एकटी पडली, अशी प्रतिक्रिया आता मन्नाराने दिली आहे.

मन्नारा चोप्रा ही प्रियांका आणि परिणीती चोप्रा यांची चुलत बहीण आहे. मन्नाराची आई ज्वेलरी डिझायनर असून त्या परिणीती आणि प्रियांका चोप्राच्या वडिलांच्या बहीण आहेत. या नात्याने मधू चोप्रा या मन्नाराच्या आत्या आहेत. मन्नाराने तेलुगू, तमिळ, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलंय. याआधी प्रियांका चोप्रानेही व्हिडीओ शेअर करत मन्नाराला पाठिंबा दर्शविला होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.