मनोज वाजपेयीवर कोसळला दु:खाचा डोंगर; दिल्लीतील रुग्णालयात आईचं निधन
'फॅमिली मॅन' मनोज वाजपेयीला मातृशोक; वर्षभरापूर्वी वडिलांनी घेतला जगाचा निरोप
दिल्ली: अभिनेता मनोज वाजपेयीची आई गीता देवी यांचं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. गीता देवी यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज (गुरुवार) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आईच्या निधनाने मनोज वाजपेयीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली.
अशोक पंडित यांनी ट्विट करत गीता देवी यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचप्रमाणे मनोज वाजपेयी आणि कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही दिवसांपूर्वी गीता देवी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं.
शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून मनोज आईची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचायचा. गेल्याच वर्षी मनोजने त्याच्या बाबांना गमावलं. ऑक्टोबर 2023 मध्ये दिल्लीतील रुग्णालयातच वडील आर. के. वाजपेयी यांनी अखेरचा श्वास घेतला होता. मनोजने अनेक मुलाखतींमध्ये आईविषयी भावना व्यक्त केल्या होत्या. आईने कायम मला खंबीर पाठिंबा दिला, असं तो एका मुलाखतीत म्हणाला होता.
Our heartfelt condolences to you and your entire family @BajpayeeManoj on the sad demise of your Aadarniya mother .
ओम शांति ! ?
— Ashoke Pandit (@ashokepandit) December 8, 2022
गीता देवी यांना तीन मुली आणि तीन मुलं आहेत. मनोज वाजपेयी हे त्यांचं दुसरं अपत्य आहे. अभिनेते मनोज कुमार यांच्या नावावरून आईवडिलांनी मनोज हे नाव ठेवलं. मनोज वाजपेयीचे वडील शेतकरी तर आई गृहिणी होती.