Manipur | ‘…ते बघणारा अख्खा एक समुह असतो!’, मणिपूर प्रकरणावर हेमांगी कवी हिची स्पष्ट भूमिका

मणिपूर घटनेवर अभिनेत्री हेमांगी कवी हिने लिहिली लक्षवेधी पोस्ट... तिच्या पोस्टवर नेटकरी देखील कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा

Manipur | '...ते बघणारा अख्खा एक समुह असतो!', मणिपूर प्रकरणावर हेमांगी कवी हिची स्पष्ट भूमिका
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 3:17 PM

मुंबई | 21 जुलै 2023 : संपूर्ण देशात मणिपूरच्या घटनेमुळे खळबळ माजली आहे. दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांना रस्त्यावर फिरवण्यात आलं. त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं. आता जवळपास अडीच महिन्यानंतर या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकरणाचे देशभर पडसाद उमटताना दिसत आहेत.  गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूर येथून हिंसाचाराचे प्रकरणं समोर येत आहेत. तर अनेकांनी यामध्ये स्वतःचे प्राण देखील गमावले आहे. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणावर पहिल्यांदा प्रतिक्रिया देत अत्याचाऱ्यांना कदापि माफ करणार नाही, असा इशारा दिला. एवढंच नाही सेलिब्रिटी देखील यावर स्वतःची स्पष्ट भूमिका मांडत आहे.

अभिनेत्री हेमांगी कवी हिने देखील मणिपूरच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘मणिपुर घटना!!! कधी थांबणार हे आणि कसं? सुन्न व्हायला होतं! हे घाणेरडं कृत्य करणारी २-३ माणसं असतील पण ते बघणारा अख्खा एक समुह असतो! त्या दोघा तिघांना अडवणारं त्यातलं कुणीच नसतं? बाप रे! इथं social media वर त्याबद्दल बोलून काही उपयोग नाही वगैरे अगदी बरोबर आहे पण जशी ती clip आणि बातमी पसरतेय तसंच थोडंसं शहाणपण आणि माणूसपण पसरलं तर?’ सध्या सर्वत्र अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. अशात भारत देशात महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं वारंवार दिसून येत आहे. मणिपूरच्या घटनेमुळे तर सर्वत्र खळबळ माजली आहे. मणिपूर घटनेतील एकाला अटक करण्यात आली. याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे. पण देशभर मात्र संतापाली लाट उसळली आहे.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्री हेमांगी कवी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मुद्द्यांवर स्वतःची भूमिका ठामपणे मांडत असते. मणिपूर घटनेवर अभिनेत्रीने लिहिलेली पोस्ट लक्षवेधी आहे. तिच्या पोस्टवर नेटकरी देखील कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार सुरु होते. मणिपूरमध्ये होणाऱ्या हिंसाचारावर सरकारने कोणतंही पाऊल उचललं नाही. यावर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र आणि राज्य सरकारला फटकारलं. “दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात येत असल्याचा व्हिडीओ अस्वस्थ करणारा असून केंद्र आणि राज्य सरकारने ठोस कारवाई करावी, अन्यथा न्यायालय हस्तक्षेप करेल”, असं न्यायालयाने बजावलं.

Non Stop LIVE Update
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या...
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या....
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?.
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय.
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा.
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?.
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी.
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज.
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?.
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.