प्रतीकशी साखरपुडा केल्यानंतर हृताला आला वाईट अनुभव; चाहत्यांना विनंती करत म्हणाली..

हिंदी टीव्ही दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत (Prateek Shah) साखरपुडा केल्यानंतर हृताला काही नकारात्मक गोष्टींना सामोरं जावं लागलं. याविषयी ती या शोमध्ये व्यक्त झाली. 'सोशल मीडियावर तुला अशी कोणती गोष्ट सर्वाधिक खुपली', असा प्रश्न संकर्षणने हृताला विचारला होता.

प्रतीकशी साखरपुडा केल्यानंतर हृताला आला वाईट अनुभव; चाहत्यांना विनंती करत म्हणाली..
Hruta DurguleImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 7:33 AM

संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालन करत असलेला ‘किचन कल्लाकार’ हा शो सध्या चांगलाच गाजतोय. या शोच्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये ‘मन उडु उडु झालं’ (Mann Udu Udu Zala) या मालिकेतील अभिनेत्री हृता दुर्गुळेनं (Hruta Durgule) हजेरी लावली. यावेळी हृतासोबत मालिकेतील अभिनेता अजिंक्य राऊतसुद्धा होता. हृता आणि अजिंक्यने किचनमध्ये धमाल केली. यावेळी संकर्षणसोबत गप्पा मारत असताना त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयीही काही गोष्टी सांगितल्या. हिंदी टीव्ही दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत (Prateek Shah) साखरपुडा केल्यानंतर हृताला काही नकारात्मक गोष्टींना सामोरं जावं लागलं. याविषयी ती या शोमध्ये व्यक्त झाली. ‘सोशल मीडियावर तुला अशी कोणती गोष्ट सर्वाधिक खुपली’, असा प्रश्न संकर्षणने हृताला विचारला होता. त्यावेळी प्रतीकवरून हृताला ट्रोल केल्याची घटना तिने सांगितली.

काय म्हणाली हृता?

“सोशल मीडियावर माझा फॅन फॉलोईंग खूप मोठा आहे. माझ्या खासगी आयुष्याबद्दल मी सोशल मीडियावर व्यक्त होत नाही. माझे सोशल मीडियावर 23 लाख फॉलोअर्स आहेत. त्यामुळे माझ्या आयुष्यातील या नव्या प्रवासाबद्दल चाहत्यांना सांगावं अशी माझी इच्छा होती. ते माझ्या कुटुंबाप्रमाणे आहेत असं समजून मी प्रतीक शाहसोबतच्या साखरपुड्याची माहिती चाहत्यांना दिली. प्रतीक हिंदी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीमधला आहे. माझ्या आयुष्यातील ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब मी सोशल मीडियावरील चाहत्यांसोबत शेअर केली. मात्र त्यावरूनच त्यांनी मला ट्रोल केलं. मराठी अभिनेत्री नेहमी हिंदी इंडस्ट्रीत काम करणाऱ्यांसोबतच लग्न का करतात, असं ते म्हणाले. मला हिंदी टीव्ही शोजमध्ये काम करायचंय, म्हणून मी प्रतीकसोबत लग्न करतेय, अशीही टीका माझ्यावर झाली. काहींनी त्याच्या लूकवरही कमेंट केली. हे सर्व अत्यंत निराशाजनक होतं”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली. हृताने यावेळी चाहत्यांना विनंतीदेखील केली. अशा कमेंट्सने एखाद्याच्या भावना दुखावल्या जातात, त्यामुळे सोशल मीडियावर एखाद्याच्या पोस्टवर कमेंट करण्यापूर्वी विचार करा, असं ती म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

कोण आहे हृताचा होणारा पती?

प्रतीक शाह हा हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. अभिनेत्री मुग्धा शाह यांचा तो मुलगा आहे. प्रतीकने ‘बेहद 2’, ‘एक दिवाना था’ आणि ‘तेरी मेरी एक जिंदगी’ यांसारख्या हिट टेलिव्हिजन मालिकांचं दिग्दर्शिन केलं आहे. प्रतीक हा उत्तम डान्सरसुद्धा आहे. त्याच्या डान्सचे व्हिडीओ तो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

हेही वाचा:

Mumbai: सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरने मुंबईत घेतलं हक्काचं घर

‘ज्या ज्या भागात हिंदू अल्पसंख्य होतील, तिथे तिथे..’; The Kashmir Files बद्दल शरद पोंक्षेंचं रोखठोक मत

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.