Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashutosh Bharke Suicide | अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीचा नांदेडमध्ये गळफास

“खुलता खळी खुलेना” फेम अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने नांदेडमध्ये आत्महत्या केली आहे (Actress Mayuri Deshmukh's husband Ashutosh Bhakre commits suicide)

Ashutosh Bharke Suicide | अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीचा नांदेडमध्ये गळफास
Follow us
| Updated on: Jul 30, 2020 | 7:29 AM

नांदेड : “खुलता खळी खुलेना” फेम अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने नांदेडमध्ये आत्महत्या केली आहे. उदयोन्मुख अभिनेता आशुतोष भाकरे याने वयाच्या 32 व्या वर्षी नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आशुतोषने आत्महत्या का केली, यामागील कारण अस्पष्ट आहे.  या घटनेने मयुरी देशमुखच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (Actress Mayuri Deshmukh’s husband Ashutosh Bhakre commits suicide)

आशुतोषचे आई-वडील नांदेडमधील ख्यातनाम डॉक्टर आहेत. मयुरी आणि आशुतोषमध्ये कोणतेही मतभेद नव्हते, असं त्यांच्या जवळचे मित्र सांगतात. लॉकडाऊनमध्ये दोघेही एकत्र होते. सध्या मयुरीही नांदेडमध्येच असल्याचं समजतंय.

नांदेडमधील गणेश नगर इथल्या घरी मयुरी आणि आशुतोषची आई घरात गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी आशुतोष वरच्या खोलीत होता. बराचवेळ झाला आशुतोष खाली आला नाही. त्यावेळी त्याचा दरवाजा ठोठावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने, दुसऱ्या बाजूने खोलीत डोकावून पाहिलं. त्यावेळी आशुतोष लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि एकच थरकाप उडाला.

आशुतोषने फेसबुरवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओतील व्यक्ती माणूस आत्महत्या का करतो? याबाबत विश्लेषण करताना दिसत होती. मात्र, तरीही आशुतोष इतका टोकाचा निर्णय घेईल, अशी कुणाला कल्पना नव्हती. आशुतोष गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्याने आज (29 जुलै) सकाळी 11 ते 12 वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतील भूमिकेने मयुरी प्रसिद्धीच्या झोतात आली. मयुरीने लिहिलेले-दिग्दर्शित केलेले नाटक ‘डिअर आजो’ने प्रचंड लोकप्रियता मिळवली. तिचे तिसरे बादशहा हम हे नाटक सुरु होते. याशिवाय डॉ. प्रकाश बाबा आमटे, 31 दिवस अशा काही चित्रपटात ती झळकली आहे.

आशुतोषने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटात काम केलं आहे. आशुतोष आणि मयुरी देशमुख 21 जानेवारी 2016 रोजी लग्नबंधनात अडकले होते. 2017 साली मयुरीने ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या निमित्ताने ‘लोकसत्ता’साठी लिहिलेल्या लेखात आपली लव्हस्टोरी सांगितली होती.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.