‘प्रत्येक गोष्टीला शेवट..’, मराठमोळ्या अभिनेत्रीचा भीषण अपघात; कारचा चुराडा… दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ व्हायरल

मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात; कारचा चुराडा... कारचा व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने व्यक्त केलं दुःख

'प्रत्येक गोष्टीला शेवट..', मराठमोळ्या अभिनेत्रीचा भीषण अपघात; कारचा चुराडा... दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 11:59 AM

मुंबई | ‘चालू द्या तुमचं’, ‘युथ’, ‘अगंबाई अरेच्चा २’ यांसारख्या अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा गंभीर अपघात झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे खुद्द अभिनेत्रीने अपघाताचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना अपघाताची माहिती दिली आहे. अभिनेता मीरा जोशी हिचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अभिनेत्रीचा अपघता झाला. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या अपघाताची चर्चा सुरू आहे. शिवाय अभिनेत्री पोस्ट केलेला व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओ नेटकरी कमेंट करत चिंता व्यक्त करत आहेत…

अपघाताचा व्हिडीओ पोस्ट करत मीराने ‘गमावलं ना मी तुला’ असं म्हटलं आहे. शिवाय कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने क्रॅश्ड अन्ड मिसिंग’ असं लिहीलं आहे. सध्या सर्वत्र मीराने शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट देखील केल्या आहेत..

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Meera Joshi (@meerajoshi_)

अपघाताचा व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘प्रिय सखी, किती आणि कुठेकुठे भटकलो ना आपण. रात्र-दिवस, ऊन-वारा, पाऊस चढ उतार काहीही असो आपण एकमेकींची काळजी घेतली. पण आज इतका भयंकर अपघात होऊनही तू स्वतःला संपवणं पत्करलंस आणि मला किरकोळ ओरखडाही जेऊ दिला नाहीस गं तू… थँक्यू. प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच. तब्बल ९० हजार मैलांचा आपला प्रवास. गमावलं ना मी तुला. आता विश्रांती घे..’ असं म्हणत अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत चिंता व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने अभिनेत्रीला काळजी घे म्हणजे चिंता व्यक्त केली आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, ‘काळजी घे आणि दामाने कार चालव पुढे…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘खूप दिवसांनंतर पोस्ट दिसली…’

मीरा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. एवढंच नाही, चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मीरा स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. लावणी करताना देखील तिने काही व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.