Jawan | शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमात झळकणार मराठमोळी अभिनेत्री; पोस्ट शेअर करत म्हणाली…

मराठी कलाकारांचा बॉलिवूडच्या दिशेने प्रवास; किंग खान याच्या 'जवान' सिनेमात झळकणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री... सध्या सर्वत्र मराठमोळ्या अभिनेत्रीची चर्चा..

Jawan | शाहरुख खान स्टारर 'जवान' सिनेमात झळकणार मराठमोळी अभिनेत्री; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 10:19 AM

मुंबई | अभिनेता शाहरुख खान याने चार वर्षांनंतर ‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि फक्त भारतात नाही तर जगभरात सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले. आता किंग खान ‘जवान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. प्रिव्ह्यू प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांच्या मनातील सिनेमाची उत्सुकता अधिक वाढली आहे. ‘पठाण’ सिनेमाप्रमाणेच ‘जवान’ सिनेमात देखील तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाहरुख खान याच्या आगामी सिनेमात मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. सिनेमाच्या प्रिव्ह्यूमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीची एक झलक पाहायला मिळाली. ज्यामुळे सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

किंग खान याच्या ‘जवान’ सिनेमात भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यामुळे अभिनेत्री प्रचंड आनंदी आहे. तर आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की ‘ती’ अभिनेत्री नक्की कोण आहे?  ‘जवान’ सिनेमात मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सिनेमाच्या प्रिव्ह्यूमध्ये गिरीजाची एक झलक दिसली आहे. पण अभिनेत्री सिनेमात नक्की कोणत्या भूमिकेत दिसेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिनेमाचा प्रव्ह्यू प्रदर्शित झाल्यानंतर गिरीजा हिने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

‘जवान’ सिनेमाचा प्रिव्ह्यू इन्स्टाग्रामवर पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये, ‘जवान सिनेमासाठी काउंटडाउन सुरु झालं आहे…’ असं लिहिलं आहे. गिरीजाने पोस्ट शेअर केल्यानंतर फक्त चाहतेच नाही तर सेलिब्रिटी देखील अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र ‘जवान’ सिनेमाची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, जेव्हा ‘जवान’ सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित झाला होता, तेव्हा देखील गिरीजाने एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या होत्या. जवान सिनेमात संधी मिळाल्यामुळे अभिनेत्री म्हणाली, ‘२ वर्षांनंतर रक्त, घाम, अश्रू.. स्वतःकडे ठेवत माझा सिनेमा… आमचा सिनेमा लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे..’

गिरीजा हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्रीने याआधी देखील बॉलिवूडमध्ये काम केलं आहे. अभिनेत्रीने ‘तारे जमीन पर’, ‘शोर इन द सीटी’ या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. आता गिरीजा हिला ‘जवान’ सिनेमात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमा ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेत्री दीपिका पादुकोण, नयनतारा, सान्या मल्होत्रा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘पठाण’ सिनेमानंतर किंग खान याचा ‘जवान’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.