हा डान्स अप्रतिम पण गाण्याचा शेवटचा सेकंद सेकंद तेवढाच सुंदर
सध्या एका डान्सची तूफान अशी चर्चा रंगताना दिसत आहे. एका लहान मुलीने आणि मुलाने मराठी गाण्यावर जबरदस्त असा डान्स केलाय. विशेष म्हणजे या डान्ससाठी त्यांचे काैतुक केले जात आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Video) तूफान व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओला लोकांचे प्रचंड प्रेम मिळताना दिसतंय. या व्हिडीओने सर्वांचे मन जिंकले आहेत. विशेष बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये दोन चिमुकले दिसत आहेत. मात्र, अत्यंत कमी वयामध्ये या चिमुकल्यांनी जबरदस्त असा डान्स (Dance) केलाय. या लहान मुलाचा आणि मुलीचा डान्स पाहुण सर्वचजण अवाक झाल्याचे दिसत आहेत. इतक्या कमी वयामध्ये इतका जास्त धमाकेदार डान्स कोणी कसे करू शकते हाच प्रश्न अनेकांना पडलाय. या व्हिडीओवर कमेंट करून लोकांनी यांचे काैतुक केले आहे.
शक्यतो हिंदी किंवा इंग्रजी गाण्यावर डान्स करण्यावर अनेकांचा भर दिसतो. त्यामध्ये शाळेतील कार्यक्रम म्हटल्यावर हमखास हिंदी गाण्यावर डान्स करण्यावर सर्वांचा कल असतो. या सर्व गोष्टींना एक छोटा मुलगा आणि मुलगी अपवाद ठरले आहेत. या मुलांनी एका मराठी गाण्यावर सुसाट असा डान्स केलाय. भल्या भल्यांना जे कधी जमले नाही ते या चिमुरड्यांनी करून दाखवले आहे.
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे? या गाण्यावर छोट्या मुलाने आणि मुलीने जबरदस्त डान्स केला आहे. यांचा हा डान्स पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय आणि प्रत्येकजण यांचे काैतुक करत आहे. पांढऱ्या रंगाची साडी नेसून मुलगी अतिशय सुंदर डान्स करत आहे. या दोघांच्या प्रत्येक स्टेप अत्यंत भारी आणि खास आहेत.
मुलाने निळ्या रंगाची नेहरू शर्ट घातला आहे. यांचा डान्स पाहून चित्रपटाचे गाणे नजरेसमोर येताना दिसतंय. विशेष म्हणजे गाण्याच्या शेवटच्या क्षणांपर्यंत यांनी तूफान असा डान्स केला. या मुलाचे आणि मुलीचे वय साधारण 6 ते 7 असावे. मात्र, 3 मिनिटे 48 शेकंदही हे दोघे कुठेचमध्ये थांबले नाहीत किंवा दोघांचे कुठेच एखादी स्टेप चुकली नाही हे अत्यंत विशेष आहे.
या मुलाच्या आणि मुलीच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील जबरदस्त आहेत. या व्हिडीओवर कमेंट करत एका युजर्सने लिहिले की, हा डान्स पाहून नक्कीच वाटत आहे की, मराठी चित्रपटाला पुढे सोन्याचे दिवस येतील. दुसऱ्याने लिहिले की, छोटा पॅक बडा धमाका आहे हे दोघे…अनेकांनी या मुलाला आणि मुलीला त्यांच्या पुढच्या करिअरसाठीही शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे डान्सच्या शेवटी या मुलाने मुलीला उचलून घेतले आहे.