AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आय लव्ह यू नव्हे तर ‘आय प्रेम यू!’, व्हॅलेंटाईन डेनिमित्त अभिजीत आमकर आणि कयादू लोहारच्या नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

व्हॅलेंटाईन डेनिमित्त अभिजीत आमकर आणि कयादू लोहारचा नवा सिनेमा आय प्रेम यूचं पोस्टर रिलीज झालं आहे.

आय लव्ह यू नव्हे तर 'आय प्रेम यू!', व्हॅलेंटाईन डेनिमित्त अभिजीत आमकर आणि कयादू लोहारच्या नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज
आय प्रेम यू
| Edited By: | Updated on: Feb 14, 2022 | 3:49 PM
Share

आयेशा सय्यद, मुंबई : प्रेम (Love) म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं! या वाक्याने तर आजवर अनेक प्रेमांना एकत्रित बांधले आहे. पावसाच्या चाहूलीने मोर जसा नाचताना पाहायला मिळतो तसा व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) आला की आपल्यात दडलेला प्रेमी आणि दडलेल्या प्रेमभावना फेर धरून नाचू लागतात. असा हा प्रेममय दिन येताच मनात फुलपाखरं बागडू लागतात आणि या रोमँटिक दिवसाची खास सुरुवात करावीशी वाटते. मात्र यंदाचा हा रोमँटिक क्षण तुमच्या भेटीस ‘साईश्री एंटरटेनमेंट’ यांच्या ‘आय प्रेम यु’ (I Prem You) या चित्रपटासोबत घालवता येणार आहे. चित्रपटाचे नाव ऐकताच चित्रपटाच्या कथेचे स्वरूप कळलेच असेल, मात्र नेमकं वेगळेपण असे या चित्रपटात काय आहे हे अनुभवण्यासाठी हा चित्रपट प्रियकरासोबत पाहणे रंजक ठरणार आहे. मात्र हा चित्रपट पाहण्यास थोडीशी वाट पाहावी लागणार आहे कारण येत्या ‘व्हॅलेंटाईन डे’ चे औचित्य साधत चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या चित्रपटाचे अभिनेता अभिजीत आमकर (Abhijeet Aamkar) मुख्य भूमिकेत दिसणार असून त्यासोबत अभिनेत्री कयादू लोहार (Kayadu Lohar) मुख्य भूमिका साकारणार आहे. अभिजीत आणि कयादूची लव्हेबल केमिस्ट्री या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचं आज पोस्टर रिलीज झालं आहे.

‘आय प्रेम यु’ चित्रपटाची प्रेमकहाणी ही फक्त प्रेमकहाणी नसून प्रेमाची कहाणी आहे. मैत्री आणि अलगद तयार झालेल्या नात्यांची ही गुंतागुंत या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. अभिजीत मुख्य भूमिकेत असून याआधी अभिजीतचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. ‘टकाटक’, ‘एक सांगायचय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अभिनेता अभिजीत आमकरने कायमच प्रेक्षकांच्या मनात घर केले. वेगवेगळ्या फोटोशूटमुळे आणि म्युझिक अल्बममधून तो प्रेक्षकांच्या भेटीस येत राहिला. आता लवकरच अभिजीत एका नव्या कोऱ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. रोमँटिक कलाकारांच्या यादीत अभिजीत कुठेही कमी नाही, त्यामुळे अभिजीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात उतरविण्यास नक्कीच तयार असेल यांत शंकाच नाही. अभिजीत आणि कयादूची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार असून त्यांच्या अभिनयाच्या आणि कथेच्या जोरावर हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या प्रेमात रंगत आणेल यांत शंकाच नाही.

या चित्रपटात अभिजीत सखा या पात्राची भूमिका साकारत असून संगीताची आवड असलेला सखा स्वतःच्या प्रेमात कसे संगीताचे सूर भरतो हे पाहणे रंजक ठरणार आहे. तर कयादू या चित्रपटात वीणा हे पात्र साकारत असून स्वप्न उराशी बाळगून आलेल्या संकटाना सामोरी जाण्याची जिद्द असणारी अशी ही वीणा आपल्या प्रेमाला कशी सामोरी जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दिग्दर्शक नितीन कहार दिग्दर्शित हा चित्रपट निर्माते मधुकर गुरसळ यांच्या ‘साईश्री एंटरटेनमेंट’ यांनी निर्मित केला आहे. या प्रेमाच्या लव्हेबल केमिस्ट्रीचे छायाचित्रण अविनाश सातोस्कर यांनी चित्रित केले आहे.

येत्या ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधत प्रदर्शित होणाऱ्या ‘आय प्रेम यु’ चित्रपटाच्या मोशन पोस्टरने प्रेमीयुगुलांची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास केव्हा येतो हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Jhund first Song : अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चं पहिलं गाणं रिलीज, तीन तासात तीन लाखांपार

तुम्हाला सोमवारी कामाचा कंटाळा येतो?, वैदेही परशुरामीचा हा फंडा वापरा आणि व्हा फ्रेश!

इम्रान हाश्मी नाही हो, भारतीय सिनेमातील सर्वात दीर्घकाळ चाललेला Kissing सीन माहितेय का? जाणून घ्या किस का किस्सा

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.