प्रेमकथेला रसिकांची दाद, अभिषेक विचारेंच्या ‘द गर्ल हू गॉट लेबल्ड’ला मिळतेय वाचकांची पसंती!  

2020-21 मधील सर्वाधिक खप असणाऱ्या अभिषेक विचारे यांच्या 'द गर्ल हू गॉट लेबल्ड' या कादंबरीला कोरोना सारख्या महामारीतही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या या तणावपूर्ण आणि नकारात्मक वातावरणात वाचकांना आनंद आणि सकारात्मकता देण्याचे काम विचारे यांच्या कादंबरीने केले आहे.

प्रेमकथेला रसिकांची दाद, अभिषेक विचारेंच्या 'द गर्ल हू गॉट लेबल्ड'ला मिळतेय वाचकांची पसंती!  
Abhishek Vichare
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 12:10 PM

मुंबई : 2020-21 मधील सर्वाधिक खप असणाऱ्या अभिषेक विचारे यांच्या ‘द गर्ल हू गॉट लेबल्ड’ या कादंबरीला कोरोना सारख्या महामारीतही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या या तणावपूर्ण आणि नकारात्मक वातावरणात वाचकांना आनंद आणि सकारात्मकता देण्याचे काम विचारे यांच्या कादंबरीने केले आहे. 2021मध्येही टाईम्सच्या सर्वाधिक खप असणाऱ्या पुस्तकांच्या यादीत या कादंबरीने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. पूर्णपणे वेगळी पार्श्वभूमी असणाऱ्या लेखकाला पदार्पणातच इतके यश मिळावे, हे लक्षणीय आहे. कधीकधी व्यवसाय हा फक्त नावापुरताच असतो. अंगातील कलागुण लोकांमध्ये खरी ओळख मिळवून देतात. अभिषेक विचारे हे त्यापैकीच एक आहेत.

‘द गर्ल हू गॉट लेबल्ड’ ही प्रेमकथा असलेली कांदबरी जुलै 2020 मध्ये वाचकांसाठी उपलब्ध झाली आणि तेव्हापासून ते आतापर्यंत या कांदबरीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ही गोष्ट आहे अनुपमाची, तिच्या जीवन प्रवासाची, तिच्या प्रेमाची. ज्यांनी आयुष्यात प्रेम, दुःख, नकार हे अनुभवले आहे, त्यांना हे पुस्तक स्पर्शून जाते. कोविड-19 चा अनेक पुस्तकांच्या विक्रीवर परिणाम झाला मात्र काही पुस्तके त्याला अपवाद ठरली. वाचकांना गुंतवून ठेवणारे कथानक, रंजकपणे गोष्ट सांगण्याची कला या बाबींमुळे अभिषेक विचारे यांचे ‘द गर्ल हू गॉट लेबल्ड’ हे पुस्तक उजवे ठरते.

पहिलीच कादंबरी!

मार्केटिंग, उद्योग, तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रात विचारे यांनी काम केले आहे. त्यांचा ‘रिचमंड’ हा भारतातील प्रसिद्ध उद्योगसमूह आहे. मुंबई विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन या विषयात ते पदवीधर आहेत. तसेच इंग्लंड विद्यापीठातून मोबाईल अँड सॅटेलाईट कम्युनिकेशन या विषयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. अभिषेक यांनी लंडनमध्ये ब्रँड अँबॅसिटर म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी लंडनमध्ये स्वतःची मार्केटिंग फर्मही उघडली आहे. मात्र आता स्वतःच्या पॅशनला प्राधान्य देत ‘द गर्ल हू गॉट लेबल्ड’ ही पहिली कादंबरी त्यांनी वाचक प्रेमींसाठी उपलब्ध केली आहे.

लेखन ही माझी आवड!

‘द गर्ल हू गॉट लेबल्ड’ या कादंबरीबद्दल लेखक अभिषेक विचारे सांगतात, ” मी शिक्षणाने इंजिनियर आणि व्यवसायाने उद्योजक जरी असलो तरी माझी खरी आवड लेखन हीच आहे. लिखाण हे नेहमीच माझे व्यक्त होण्याचे माध्यम राहिले आहे. माझ्या पहिल्याच पुस्तकाला मिळणाऱ्या वाचकांच्या प्रतिसादामुळे मी आनंदी आहे. पुढील लिखाणसाठी ते मला प्रोत्साहीत करते. अनुपमाची गोष्ट मला खूप जवळची आहे. माझ्या आयुष्यातील काही अनुभव त्यात आहेत. ही कादंबरी वाचकांच्या मनाला भिडण्याचे कारण कथेतील खरेपणा आहे. मला आशा आहे, या कादंबरीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जाईल.

कोरोना काळातही 2020 मध्ये आलेल्या अभिषेक विचारे यांच्या ‘द गर्ल हू गॉट लेबल्ड’ या कादंबरीला वाचकप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अमेझॉनच्या उत्तम पुस्तकांच्या यादीमध्ये या पुस्तकाचा समावेश असून जगभरातील वाचकप्रेमींसाठी अमेझॉनवर ते उपलब्ध आहे.

हेही वाचा :

Song Aila Re Aillaa : अजय-रणवीरसोबत अक्षयचे जोरदार ठुमके, बहुप्रतीक्षित ‘सूर्यवंशी’चं पाहिलं गाणं चाहत्यांच्या भेटीला!

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या जामिनासाठी हायकोर्टात धाव, आता NCB ची पुढची पावलं काय?

The Big Picture : ‘द बिग पिक्चर’च्या सेटवर सारा-जान्हवीची हजेरी; रणवीर सोबत केली धमाल, पाहा फोटो

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.