‘शुभ्रा-बबड्या’चं नक्की चाललंय काय? आशुतोष-तेजश्रीच्या सोशल मीडिया संवादावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चा!

नुकताच तेजश्री प्रधान हिचा वाढदिवस झाला. या निमित्ताने अभिनेत्रीला सोशल मीडियावर अनेक शुभेच्छा मिळाल्या. तेजश्रीसाठी अनेक पोस्ट लिहिल्या गेल्या. मात्र, या सगळ्यात एका पोस्टने चाहत्यांचे खास लक्ष वेधून घेतले. ही खास पोस्ट केलीय तेजश्रीचा सहकलाकार अभिनेता आशुतोष पत्की याने केली आहे.

‘शुभ्रा-बबड्या’चं नक्की चाललंय काय? आशुतोष-तेजश्रीच्या सोशल मीडिया संवादावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चा!
आशुतोष-तेजश्री
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 2:41 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘अग्गबाई सासूबाई’ ही चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली होती. या मालिकेतील ‘बबड्या’ अर्थात सोहम कुलकर्णी आणि त्याची पत्नी शुभ्रा कुलकर्णी ही पात्र विशेष गाजली होती. अभिनेता आशुतोष पत्की (Ashutosh Patki) याने ‘सोहम कुलकर्णी’ तर, अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) हिने ‘शुभ्रा कुलकर्णी’ हे पात्र साकारले होते. दोघांनीही या भूमिकेत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. मात्र, आता पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आली आहे (Actor Ashutosh Patki share special post for co star Tejashri Pradhan on her birthday).

नुकताच तेजश्री प्रधान हिचा वाढदिवस झाला. या निमित्ताने अभिनेत्रीला सोशल मीडियावर अनेक शुभेच्छा मिळाल्या. तेजश्रीसाठी अनेक पोस्ट लिहिल्या गेल्या. मात्र, या सगळ्यात एका पोस्टने चाहत्यांचे खास लक्ष वेधून घेतले. ही खास पोस्ट केलीय तेजश्रीचा सहकलाकार अभिनेता आशुतोष पत्की याने केली आहे.

पाहा आशुतोष पत्कीची पोस्ट

आशुतोषने तेजश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपल्या या पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझ्या प्रिय मैत्रिणी, मला तुला हे सांगायचं आहे की तू माझ्यासाठी खूप खास आहे. तू दिलेल्या प्रोत्साहानाबद्दल, तुझ्या पाठींब्याबद्दल आणि मला एक चांगला माणूस व अभिनेता बनण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल खूप आभार.

तुझ्या वाढदिवसानिमित्ताने खास 2 टिप्स : तू भूतकाळ विसरून जा, कारण तो बदलता येत नाही…आणि दुसरं म्हणजे तुझ्या वाढदिवसाची भेट, जी मी आणलीच नाहीय… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!’

या पोस्टमध्ये आशुतोषने तेजश्रीला भूतकाळ विसरण्याचा सल्ला दिला आहे. तर, मजेशीर अंदाजात तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहे (Actor Ashutosh Patki share special post for co star Tejashri Pradhan on her birthday).

तेजश्रीची प्रतिक्रिया

आशुतोषच्या या खास बर्थ डे पोस्टवर तेजश्रीने देखील ‘खास’ कमेंट करत त्याचे आभार मानले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना तेजश्री म्हणाली की, ‘मी एक गोष्ट विसरेन, पण ‘भेट’ नाही. नाहीच!, तुला माझ्यासाठी गिफ्ट आणावंच लागेल. तुझ्या या खास पोस्टसाठी खूप खूप आभार!’

दोघांच्या या सोशल संवादामुळे दोघांच्याही चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. काही जणांनी ही जोडी रील लाईफ प्रमाणेच रिअल लाईफमध्ये देखील पाहायला आवडेल, असे देखील म्हटले आहे.

चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेतील सर्वात महत्त्वाचं पात्र ‘बबड्या’ अर्थात ‘सोहम कुलकर्णी’ हे प्रचंड गाजलं होतं. या भूमिकेत असणारा अभिनेता आशुतोष पत्कीला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. सोबतच तेजश्री प्रधान साकारत असलेली ‘शुभ्रा’ देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. परंतु, अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला या मालिकेतून एवढी प्रसिद्धी मिळत असूनही, तिने ही मालिका का सोडली असावी?, अशी शंका चाहत्यांच्या मनात आली होती. शेवटी सगळ्यांना आयुष्यात पुढे जायचे असते, वेगळी वेगळी ध्येय पूर्ण करायची असतात. तसेच काहीसे तेजश्री बरोबर झाले आहे. तेजश्री आता लवकरच बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अभिनेता शर्मन जोशी सोबतचा तिचा ‘बबलू बॅचलर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

(Actor Ashutosh Patki share special post for co star Tejashri Pradhan on her birthday)

हेही वाचा :

Lookalike: दिसायलाही नाना सारखा, आवाजही नाना सारखा; नाना पाटेकरांचा ड्युप्लिकेट पाहाच!

Hrithik Roshan : ऋतिक रोशनचा सिंटासाठी पुढाकार, कोरोनाच्या दूसऱ्या लाटेत पुन्हा मदतीचा हात!

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.