Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swapnil Joshi | स्वप्निल जोशीलाही पडलाय प्रश्न, कोण आहे एलिझाबेथ? लवकरच मिळणार उत्तर!

मराठी मनोरंजन विश्वात सध्या नवनवीन प्रयोग सुरु आहेत. असाच एक नवीन प्रयोग आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे.

Swapnil Joshi | स्वप्निल जोशीलाही पडलाय प्रश्न, कोण आहे एलिझाबेथ? लवकरच मिळणार उत्तर!
स्वप्निल जोशी
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 12:56 PM

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात सध्या नवनवीन प्रयोग सुरु आहेत. असाच एक नवीन प्रयोग आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. नेहमीच प्रेमाची परिभाषा सांगणारा मराठी चित्रपट सृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ अभिनेता स्वप्निल जोशी रसिकांना भीतीचा धक्का देणार आहे. ‘कोण आहे एलिझाबेथ?’ असा प्रश्न पडलेल्या चाहत्यांना लवकरच याचे उत्तर मिळणार आहे (Actor Swapnil Joshi upcoming horror movie bali).

ही सगळी चर्चा सुरु ती आगामी चित्रपट ‘बळी’ची. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये एका व्यक्तींचा भीतीदायक चेहरा रक्त आणि डोळ्यांत क्रॉसच्या प्रतिमांचा वापर करून, भीतीदायक वातावरण दर्शवले गेले आहे. हे पोस्टर भीतीदायक पटकथेची जाणीव करून देते. ती अर्थात एलिझाबेथ कोण आहे?च्या टॅग लाईनमधून अघटीत आणि भितीपूर्ण वातावरणाचे सुतोवाच होते. त्यातून या चित्रपटाची कथा आणि पटकथा भीतीदायक असेल, याची कल्पना येते आणि त्यातून प्रेक्षकांना काही धडकी भरवणारे प्रसंग पडद्यावर अनुभवता येतील याची खुणगाठ बांधता येते.

हॉरर चित्रपटाचा मोठा बोलबाला!

या हॉरर मराठी चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला आहे. या चित्रपटाची निर्मिती जीसिम्सने केली आहे. या कंपनीने ‘मोगरा फुलाला’, ‘बोनस’ आदी गाजलेले मराठी चित्रपट आणि ‘समांतर-1’ आणि ‘समांतर-2’ तसेच ‘नक्सलबारी’ यांसारख्या वेबसीरीजची निर्मिती केली आहे. विशाल फुरिया हे ‘लपाछपी’ या तीन वर्षांपूर्वी आलेल्या आणि गाजलेल्या थ्रिलर चित्रपटाने प्रकाशझोतात आले होते. या यशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या नवीन हॉरर चित्रपटाची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक विशाल फुरिया म्हणाले, ‘लपाछपी’ला मराठी प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यांना हॉरर चित्रपट आवडतात, हे दाखवून दिले. त्यांच्या या प्रतिसादाला दाद म्हणून मी, मराठी प्रेक्षकांसाठी हॉरर चित्रपट बनवत राहायचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.’(Actor Swapnil Joshi upcoming horror movie bali)

स्वप्निल जोशीही उत्सुक!

या चित्रपटाबद्दल स्वप्निलला खूप उत्सुकता आहे. तो म्हणतो, “यंदा मी नव्या प्रकारातील चित्रपट करेन, असे आश्वासन गेल्यावर्षी मी प्रेक्षकांना दिले होते. त्या दृष्टीने मी उचललेले हे एक पाऊल आहे. हॉरर चित्रपट करण्याची संधी मला मिळते आहे, हे मी माझे भाग्य समजतो. ते करत असताना कार्तिक, अर्जुन यांच्यासारखे माझे आवडते निर्माते मला मिळाले आणि त्याचवेळी माझा लाडका दिग्दर्शक विशाल हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. मला पूर्ण खात्री आहे की, आम्ही एकत्रितपणे प्रेक्षकांना घाबरवू शकतो. आणि त्याचा प्रेक्षक चांगलाच आनंद घेतील.”

तो पुढे म्हणतो, “जर तुम्ही थोडेसा मागे जाऊन विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की मराठी चित्रपट क्षेत्राने ‘लपाछपी’च्या आधी कधीही हॉरर चित्रपटाचा प्रयोग केलेला नाही. हॉरर विनोदी चित्रपटांचे प्रयोग झाले, पण तुमची झोप उडवेल असा मराठी चित्रपट झाला नाही. मला वाटते ‘बळी’ ती पोकळी नक्कीच भरून काढेल. त्यापेक्षाही अधिक महत्वाचे म्हणजे चित्रपटाची कथा तुम्हाला घाबरवून टाकते. नेहमी ज्याप्रमाणे भारतीय हॉरर चित्रपटांमध्ये होते तसे भडक संगीत आणि उड्या मारून भीती निर्माण करण्याचा प्रकार येथे नाही.”

लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

(Actor Swapnil Joshi upcoming horror movie bali)

अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार प्रस्तुतकर्ता असलेल्या आणि जीसिम्सची निर्मिती असलेल्या नवीन व बहुप्रतीक्षित अशा ‘बळी’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे 4 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात आले. ‘बळी’ या हॉरर चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांचे असून स्वप्निल जोशी यात महत्वाच्या भूमिकेत आहे. बहुप्रतीक्षित ‘बळी’ चित्रपट 16 एप्रिल 2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार.

(Actor Swapnil Joshi upcoming horror movie bali)

हेही वाचा :

Income Tax Raid | हॉटेल बदललं, मात्र अनुराग-तापसीची चौकशी सुरूच! आयकर विभागाची टीमही हजर

PHOTO | ‘कुछ चीज़े हम पुरानी छोड़ आये हैं…’, पाहा श्रुती मराठेचे मनमोहक फोटो!

पुणे प्रकरणात गावकऱ्यांकडून मिळाली मोठी माहिती, ‘आरोपी आला अन्..’
पुणे प्रकरणात गावकऱ्यांकडून मिळाली मोठी माहिती, ‘आरोपी आला अन्..’.
'... नाहीतर कपडे फाडून घरी पाठवू', राणेंनी काढली वडेट्टीवारांची लायकी
'... नाहीतर कपडे फाडून घरी पाठवू', राणेंनी काढली वडेट्टीवारांची लायकी.
संजय शिरसाट यांची सिडको बस स्थानकात पाहाणी; कर्मचाऱ्यांना धरले धारेवर
संजय शिरसाट यांची सिडको बस स्थानकात पाहाणी; कर्मचाऱ्यांना धरले धारेवर.
डॉगस्कॉड अन् ड्रोन! बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पकडण्यास पोलिसांचा शोध
डॉगस्कॉड अन् ड्रोन! बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पकडण्यास पोलिसांचा शोध.
VIDEO : एसटीच्या हायटेक 'शिवशाही'ची दयनीय अवस्था, दोरीनं बांधला दरवाजा
VIDEO : एसटीच्या हायटेक 'शिवशाही'ची दयनीय अवस्था, दोरीनं बांधला दरवाजा.
दीड हजार पानांचं आरोपपत्र; सीआयडीचं पथक बीडमध्ये दाखल
दीड हजार पानांचं आरोपपत्र; सीआयडीचं पथक बीडमध्ये दाखल.
'जीव जळतो असं पाहून पण...', वसंत मोरेंचं ठाकरेंकडून कौतुक, ऐका ऑडिओ
'जीव जळतो असं पाहून पण...', वसंत मोरेंचं ठाकरेंकडून कौतुक, ऐका ऑडिओ.
स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?
स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?.
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! नराधम बापाकडून तीन मुलींवर अत्याचार
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! नराधम बापाकडून तीन मुलींवर अत्याचार.
ढसाळ कोण?, सेन्सॉर बोर्डाला ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यानं झापलं
ढसाळ कोण?, सेन्सॉर बोर्डाला ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यानं झापलं.