‘एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?’, अभिनेत्री केतकी चितळेचा फेसबुकवर प्रश्न

केतकी चितळे हिने शेअर केलेल्या व्हिडीओत एक व्यक्ती बसला अडवा येतो. तो भलामोठा दगड हातात घेऊन एसटी बसच्या पुढच्या काचेवर फेकतो. यावेळी बस ड्रायव्हर त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो. दगडफेक करणाऱ्यासोबत तिथे इतर कुणीही आंदोलक दिसत नाहीयत. तो एकटा बसवर दगडफेक करताना दिसतोय.

'एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?', अभिनेत्री केतकी चितळेचा फेसबुकवर प्रश्न
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 9:59 PM

मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे दुसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला आठ दिवस पूर्ण झाले आहेत. पण मराठा आरक्षणावर तात्काळ तोडगा निघालेला नाही. राज्य सरकारच्या दरबारी जोरदार हालचाली सुरु आहेत. सरकारकडून सातत्याने बैठका सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्वपक्षीय बैठकही घेतली. तर दुसरीकडे काही ठिकाणी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. अनेक ठिकाणी रस्ता रोखून टायर जाळून आंदोलन केलं जात आहे. पण त्याचं स्वत: मनोज जरांगे यांनी समर्थन केलेलं नाही.

दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये मराठा आरक्षणासासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला वेगळं वळण लागलं. काही आंदोलकांनी माझलगाव नगरपरिषदेचं कार्यालय फोडलं. तिथे जाळपोळ केली. तसेच काही जणांनी आमदार प्रकाश सोळंकी यांच्या बंगल्यावर दगडफेक केली. बंगल्याच्या परिसरात असलेली गाडी जाळली. तसेच बंगल्यालाही आग लावली. आमदार संदीप शिरसागर यांच्या बंगल्याला काही आंदोलकांनी आग लावली. माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाला काही आंदोलकांनी आग लावली. या घटना वाढत असल्यामुळे सरकारला बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करावी लागली. आता बीडमधील परिस्थिती निवळली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे मेसेज पसरुन आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी राज्य सरकारने तीन जिल्ह्यांमध्ये सध्या इंटरनेट बंद केलंय. यामध्ये छत्रपती सभाजीनगरचा ग्रामीण भाग, जालना जिल्हा आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. असं असलं तरी काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्री केतकी चितळे हिने देखील एका व्हिडीओची लिंक शेअर करत सवाल उपस्थित केले आहेत.

केतकी नेमकं काय म्हणाली आहे?

केतकी चितळे हिने शेअर केलेल्या व्हिडीओत एक व्यक्ती बसला अडवा येतो. तो भलामोठा दगड हातात घेऊन एसटी बसच्या पुढच्या काचेवर फेकतो. यावेळी बस ड्रायव्हर त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो. दगडफेक करणाऱ्यासोबत तिथे इतर कुणीही आंदोलक दिसत नाहीयत. तो एकटा बसवर दगडफेक करताना दिसतोय. व्हिडीओमध्ये त्याच्या हालचाली पाहता तो नशेत दिसतोय. त्याला तिथला एक स्थानिक थांबवतो. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हाच व्हिडीओ केतकीने शेअर केलाय.

“इंडियाला Uniform Civil Code (UCC) हवा असेल, पण भारताला #UniformCivilLaw, तसेच #UniformCriminalLaw ची गरज आहे. सरकारकडे मागणी करा, सामान्य माणसाला त्रास देऊन काय होणार? आणि एसटी विभाग किंवा चालक कसे देणार आरक्षण? चुकुन तो दगड चालकाला लागला असता तर?”, असे सवाल केतकीने उपस्थित केले आहेत.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.