Vijeta | भूमिकेसाठी कायपण! अभिनेत्री प्रीतम कागणेने ‘विजेता’ चित्रपटातील भूमिकेसाठी घटवले वजन!
अभिनेत्री प्रीतम कागणे (Pritam Kagane) ‘विजेता’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. ती या सिनेमात सुनंदा गुजर नामक ऍथलिट रनरची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे प्रीतमने या भूमिकेसाठी तब्बल 6 किलो वजन कमी केले आहे.
मुंबई : अभिनेत्री प्रीतम कागणे (Pritam Kagane) ‘विजेता’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. ती या सिनेमात सुनंदा गुजर नामक ऍथलिट रनरची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे प्रीतमने या भूमिकेसाठी तब्बल 6 किलो वजन कमी केले आहे. सांगली जवळील वठार या छोट्याश्या गावात लहानाची मोठी झालेली अशी ही सुनंदा आहे. लहानपणापासून नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने पुढचा पल्ला गाठला. गावखेड्यात हव्या त्या सोयी उपलब्ध नसल्याने आपले स्वप्न कसे पूर्ण होईल यासाठी ती सतत झटत राहते.
मात्र, या प्रवासादरम्यान तिला साथ मिळाली ती माईंड कोचची. या चित्रपटात माईंड कोचच्या भूमिकेत सुबोध भावे दिसणार आहेत. सुनंदाला नॅशनल लेव्हलचे धडे देऊन ते स्पर्धेसाठी तयार करतात. एक मॅरेथॉन रनर घडविण्यासाठी तब्बल आठ वर्षाचा कालावधी लागतो मात्र प्रीतमला हा आठ वर्षाचा कालावधी अवघ्या दोन महिन्यात ट्रेनिंग घेऊन पूर्ण केला. दररोज तीन तास नॅशनल ऍथलिट यांच्याकडून ट्रेनिंग घेऊन तो सराव तिने जिद्दीने पूर्ण केला. दररोज 18 किमी धावून विविध खेळाडूंचे व्हिडीओ युट्युबवर पाहून हवा तसा आहार तिने घेतला. योग्य तो आहार घेऊन प्रीतमने तब्बल सहा किलो वजन कमी केले.
मेहनतीचे चीज झाले!
चित्रपटात प्रीतमसोबत अभिनेत्री पूजा सावंत देखील दिसणार आहे. तिच्यासोबतचे बऱ्याचदा धावण्याच्या स्पर्धेचे काही सीन पाहायला मिळणार आहेत. याबद्दल बोलताना प्रीतम असे म्हणाली की, मी विजेता सिनेमासाठी 6 किलो वजन कमी केले, या चित्रपटात मी साकारत असलेल्या रनर ऍथलिटच्या भूमिकेसाठी केलेल्या मेहनतीचे चीज झाले. मी केलेली मेहनत या चित्रपटातून नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. या चित्रपटात मैत्रीच्या आधारासह बरेच काही अनुभवता येणार आहे.
प्रीतमची कारकीर्द
प्रीतमच्या अभिनयाची वाटचाल ही दाक्षिणात्य चित्रपटातून झाली आहे. ‘मिस्टर बिन’ या मल्याळम चित्रपटात प्रमुख भूमिका साकारून दाक्षिणात्य सिनेरसिकांच्या मनात तिने एक वेगळेच स्थान निर्माण केले. त्यानंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीकडे आपला मोर्चा वळविला. ‘नवरा माझा भोवरा’, ‘हलाल’, ‘अहिल्या’ यासारख्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. याशिवाय सोहा अली खानसोबतच्या ’31 ऑक्टोबर’ या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. बेस्ट डेब्यु म्हणून ‘संस्कृती कालादर्पण अवॉर्ड’, बेस्ट प्रॉमिसिंग ऐक्ट्रेस म्हणून ‘दादासाहेब फाळके अवॉर्ड’, बेस्ट ऐक्ट्रेस म्हणून ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड’ आणि ‘सह्याद्री सिने अवॉर्ड’ पटकावत अभिनय क्षेत्रात कौतुकाची थाप मिळवली.
हेही वाचा :
Janhvi Kapoor | परी म्हणू की सुंदरा… जान्हवी कपूरच्या दिलखेचक अदा पाहून चाहतेही घायाळ!