‘मी वसंतराव’नंतर केदार शिंदे यांच्या नव्या सिनेमाची घोषणा, ‘बाईपण भारी देवा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर जिओ स्टुडिओज् ने हा दुसरा पण अत्यंत वेगळा बाज असलेला चित्रपट घेऊन येत आहेत. जिओ स्टुडिओज प्रस्तुत एमव्हीबी मीडिया निर्मित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका वैशिष्ठ्यपूर्ण पोस्टरने घोषणा करण्यात आली.

‘मी वसंतराव’नंतर केदार शिंदे यांच्या नव्या सिनेमाची घोषणा, ‘बाईपण भारी देवा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
‘बाईपण भारी देवा!’- सिनेमा
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 10:06 AM

मुंबई : प्रेक्षकांच्या मनातील भावना, आवडीनिवडी अचूक ओळखून, तुमच्याआमच्या घरातील गोष्ट अगदी सहजरित्या प्रेक्षकांसमोर मांडणारे दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. जिओ स्टुडिओज प्रस्तुत एमव्हीबी मीडिया निर्मित ‘बाईपण भारी देवा’ (Bai Pan Bhari Deva) या चित्रपटाची जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका वैशिष्ठ्यपूर्ण पोस्टरने घोषणा करण्यात आली आहे.‘ मी वसंतराव’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर आज जिओ स्टुडिओज् ने हा दुसरा पण अत्यंत वेगळा बाज असलेला बाईपण भारी देवा चित्रपट घेऊन येत आहेत. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत माधुरी भोसले निर्मित ‘बाईपण भारी देवा’मध्ये सहा प्रमुख लोकप्रिय महिला कलाकार असणार आहेत, पण त्याची नावं अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत.

‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर जिओ स्टुडिओज् ने हा दुसरा पण अत्यंत वेगळा बाज असलेला चित्रपट घेऊन येत आहेत. तसंच एमव्हीबी मीडिया यांची निर्मिती असलेला हा पहिलाच चित्रपट असून माधुरी भोसले यांनी याची निर्मिती केली आहे. त्यांना बेला शिंदे आणि अजित भुरे यांचा सह-निर्माते म्हणून सहभाग लाभला आहे.आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या, एखाद्या संवेदनशील घटनेविषयी, सामान्य माणसाच्या प्रश्नाविषयी मात्र अगदी हलक्याफुलक्या पध्दतीने त्याची मांडणी करण्याची ताकद केदार शिंदे यांच्या चित्रपटात असते.

चित्रपटाच्या या घोषणेनिमित्त दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, “या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांसोबत शेअर करण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा चांगला दिवस कोणता असूच शकत नाही. मला कायम असे वाटते की, महिला दिन साजरा करण्यासाठी केवळ एकच दिवस पुरेसा नसून दररोजच महिलांचं काम, सहभाग, योगदान आणि आवाका याची जाणीव ठेवायला हवी. हाच विचार घेऊन हा चित्रपट मी निर्माण केला आहे. आणि जर आपण बघितलं तर आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचं कर्तुत्व भारी ठरतं आहे. त्यांच्या याच धडाडीला माझा हा कलात्मक सलाम आहे”

जिओ स्टुडिओज् प्रस्तुत माधुरी भोसले निर्मित ‘बाईपण भारी देवा’मध्ये सहा प्रमुख लोकप्रिय महिला कलाकार असणार आहेत, पण त्याची नावं अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या

Bipasha Basu Karan Grover : बिपाशा बासू आणि करण ग्रोव्हर एकत्र स्पॉट, पाहा फोटो…

तो सध्या काय करतो? ‘तारे जमीन पर’मधील ‘ईशान अवस्थी’ आता झालाय ‘हँडसम हंक’

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसोबत होणाऱ्या वर्णभेदावर भडकली सोनम कपूर; म्हणाली..

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.