Jhund Song: लफडा झाला वाकडा तिकडा, नागराजच्या झूंडचं दुसरं गाणं रिलिज, झिंगाटपेक्षा भारी?
बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला 'झुंड' हा चित्रपट येत्या 8 मार्चला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं नवं गाणं आज रिलिज झालं आहे. 'लफडा झाला', असे या गाण्याचे बोल आहे.
मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांची मुख्य भूमिका असलेला ‘झुंड’ (Jhund) हा चित्रपट येत्या 8 मार्चला रिलीज (Jhund release 4 march) होणार आहे. या चित्रपटाचं नवं गाणं आज रिलिज झालं आहे. ‘लफडा झाला’ (Lafada Zala), असे या गाण्याचे बोल आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गीत लिहिलं आहे. अजय-अतुल यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. तर अजय गोगावले यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्याला चांगलीच पसंती मिळताना दिसतेय. तीन तासात या गाण्याला दोन लाखांहून जास्त लोकांनी पाहिलं आहे. हे गाणं आवडल्याचं यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून अनेकांनी सांगितलं आहे. हे गाणं नागराज यांच्याच सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यापेक्षाही भारी असल्याचं बोलंल जातंय. या चित्रपटातील ‘आया है झुंड’ हे गाणं याआधी रिलीज झालं आहे. या चित्रपटाबाबत सगळ्यांमध्येच उत्सुकता आहे. मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
‘लफडा झाला’ गाणं रिलीज
अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला ‘झुंड’ हा चित्रपट येत्या 8 मार्चला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं नवं गाणं आज रिलिज झालं आहे. ‘लफडा झाला’, असे या गाण्याचे बोल आहे. अजय-अतुल यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. तर अजय गोगावले यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्याला चांगलीच पसंती मिळताना दिसतेय. तीन तासात या गाण्याला दोन लाखांहून जास्त लोकांनी पाहिलं आहे.
सिनेरसिकांच्या प्रतिक्रिया
‘लफडा झाला’ गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. अजय गोगावले यांच्या आवाजातील हे गाणं आवडल्याचं यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून अनेकांनी सांगितलं आहे. एकाने अजय गोगावले यांचा आवाज अफलातून असल्याचं म्हटलंय. तर एकाने या गाण्यामुळे सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली असल्याचं म्हटलंय.अश्याच कमेंट्सने या गाण्याचा यूट्यूबवरचा कमेंट बॉक्स ओसंडून वाहतोय. एक हजारांहून अधिक जणांनी कमेंट करत गाणं आवडल्याचं सांगितलंय.
सिनेमा गोष्ट
हा सिनेमा झोपडपट्टीत राहणारी मुलं आणि त्यांचे क्रीडा प्रशिक्षक यांच्यावर बेतलेला आहे. अमिताभ बच्चन हे क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे. सत्यकथेवर आधारित हा सिनेमा आहे. नागराज मंजुळे यांना या सिनेमाची कथा लिहिण्यासाठी दोन वर्षांचा वेळ लागला. या चित्रपटाची कथा लिहिताना अमिताभ बच्चन यांना डोळ्यासमोर ठेवून या सिनेमातील प्रशिक्षकाचं पात्र नागराज मंजुळे यांनी लिहिलं आणि आता स्वत: अमिताभ बच्चन यांनी साकारलेलं विजय बारसे हे पात्र घेऊन सिनेमा 4 मार्चला प्रदर्शित होतोय. हा सिनेमा विजय बारसे आणि त्यांचे शिष्य यांच्यावर आधारित आहे.
संबंधित बातम्या