Sarsenapati Hambirrao | ‘केलेल्या कामाचं चीज झालं!’, ‘बाहुबली’ प्रभासकडून प्रवीण तरडेंच्या ‘सरसेनापती हंबीरराव’चं कौतुक!

‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास याने प्रवीण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या टीझरचे कौतुक केले आहे. प्रभासने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित चित्रपटाचे कौतुक केले आहे.

Sarsenapati Hambirrao | ‘केलेल्या कामाचं चीज झालं!’, ‘बाहुबली’ प्रभासकडून प्रवीण तरडेंच्या ‘सरसेनापती हंबीरराव’चं कौतुक!
Sarsenapati Hambirrao
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 11:03 AM

मुंबई : ‘महाराजांचं स्वराज्य अठरा पगड जातीजमातींनी मिळून उभं केलं.. हिंदवी स्वराज्यासाठी जो मरणासमोर हटून उभा राहिला तो मरहट्टा.. वीर मराठा..’, असं म्हणत 18 डिसेंबरला ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) या ऐतिहासिक मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या जबरदस्त टीझरने या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढवली. या टीझरमध्ये मराठ्यांच्या इतिहासातील एक सोनेरी पान उलगडताना दिसले. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) हे ‘सरसेनापती हंबीरराव’ यांची भूमिका सकारात असून, त्यांच्या दमदार अभिनयाने हा टीझर आणखीनच धमाकेदार वाटला.

आता या टीझरला चक्क ‘बाहुबली’कडून कौतुकाची थाप मिळाली आहे. ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास याने प्रवीण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या टीझरचे कौतुक केले आहे. प्रभासने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित चित्रपटाचे कौतुक केले आहे.

पाहा पोस्ट :

‘केलेल्या कामाचं चीज झालं!’

प्रवीण तरडे यांनी देखील या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘केलेल्या कामाचं चीज झालं…’, असं म्हणत त्यांनी आभार मानले आहेत. त्यांनी पोस्ट लिहित म्हटले की, ‘केलेल्या कामाचं चीज झालं..आज सरसेनापती हंबीररावच्या टिझरचं कौतुक बाहुबली प्रभासने केलं.. परवा जवळचे मित्र सुबोध भावे, संजय जाधव, विजु माने, अमित भंडारी, अमेय खोपकर यांनीही केल होतं.. मित्रांनो तुमचेही खुप आभार असेच पाठीशी राहा.. आज प्रभासने दिलेल्या शुभेच्छा पुढच्या प्रवासात महत्वाच्या ठरतील..’

पाहा पोस्ट :

प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या संवेदनशील, सामाजिक चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्सऑफीसवर दणदणीत यश संपादन केलं होतं. यामुळे प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढचा चित्रपट कोणता? याबद्दल रसिकांच्या मनात उत्सुकता होती, तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासून महाराष्ट्रासह जगभरातील चाहते या ऐतिहासिक चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

गश्मिर महाजनी साकारणार मुख्य भूमिका

प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ मध्ये कोणते कलाकार, कोणती ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसले. शिवजयंतीच्या मुहूर्तावर यातील एका महत्वपूर्ण व्यक्तिरेखेचा उलगडा झाला होता. मराठीतील हॅंड्सम हंक अभिनेता गश्मीर महाजनी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा :

Happy Birthday Ravi Dubey | मालिकेच्या सेटवर भेट झाली अन् अभिनेत्रीच्या प्रेमातच पडला! वाचा रवी दुबेची लव्हस्टोरी…

Ganapath | अरे देवा! टायगरच्या डोळ्याला काय झालं? ‘गणपत’च्या चित्रिकरणादरम्यान टायगर श्रॉफ जखमी!

चाहत्याच्या लग्नात चक्क सेलिब्रिटींची एण्ट्री, ‘ओम आणि स्वीटू’ जोडीने विवाह सोहळ्याचा आनंद दुणावला!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.