AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत लवकरच ऑस्करपेक्षाही मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करेल; बरुण दास यांना विश्वास

दादासाहेब फाळके यांनी 1993 मध्ये राजा हरिश्चंद्र हा सिनेमा तयार केला. अनेकांना एक गोष्ट माहीत नाही. ती म्हणजे राजा हरिश्चंद्र सिनेमा बनवल्यानंतर दादासाहेब फाळके यांना त्यांच्या एका इंग्रज मित्राने लंडनमध्ये सिनेमा बनवण्याची ऑफर दिली होती. पण दादासाहेबांनी ही ऑफर नाकारली.

भारत लवकरच ऑस्करपेक्षाही मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करेल; बरुण दास यांना विश्वास
barun dasImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 09, 2023 | 10:29 PM
Share

मुंबई | 9 डिसेंबर 2023 : महाराष्ट्र ही डायनामिक मराठ्यांची भूमी आहे. महाराष्ट्राने देशाला आकार देण्यात मोठं योगदानही दिलं आहे. महाराष्ट्र ही जशी डायनामिक मराठ्यांची भूमी आहे, तशी ती भारतीय सिनेमाची जन्मभूमीही आहे. याच मातीत भारतीय सिनेमचाी पायाभरणी झाली. आपण ज्या वेगाने पुढे जात आहोत, त्यावरून एक दिवस आपण ऑस्करपेक्षाही मोठा प्लॅटफॉर्म उभा करू अशी मला आशा आहे, असा विश्वास TV9 चे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी व्यक्त केला.

टीव्ही 9 मराठीच्या वतीने ‘आपला बायोस्कोप 2023’ या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतल्या सहारा हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. टीव्ही ९ मराठीचे संपादक उमेश कुमावत, अभिनेता रितेश देशमुख यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी TV9 चे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

भारतीय सिनेमाचं महत्त्व आणि महाराष्ट्राशी त्याचं असलेलं नातं यावर प्रकाश टाकतानाच बरुण दास यांनी जागतिक सिनेमावरही भाष्य केलं. महाराष्ट्राने देशाला आकार देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. हे राज्य भारतीय सिनेमाचं माहेरघर आहे. इथेच भारतीय सिनेमाचा जन्म झाला. दादासाहेब फाळके यांनी भारतीय सिनेमाची पायाभरणी केली. ते भारतीय सिनेमाचे जनक आहेत, असं  TV9 चे एमडी आणि सीईओ बरूण दास यांनी सांगितलं.

कला एकजूट कायम ठेवते

कलाही मानावाने तयार केलेली संकल्पना आहे. कला समाजाची एकजूट कायम ठेवते. धर्म, भाषा, राजकारणाने दुभंगता येऊ शकते. पण कलाही कायम एकजूट ठेवण्याचं काम करते. धर्म भाषा राजकारण डिलिसीव्ह होतं. पण आर्ट एकजूट ठेवते, असं सांगतानाच मी खूप आशावादी आहे. आपला देश लवकरच ऑस्करपेक्षाही मोठा प्लॅटफॉर्म उभारू शकेल असं मला वाटतं. आणि मराठी माणूसच ही किमया घडवून आणू शकतो, असाही मला विश्वास आहे, असंही बरुण दास म्हणाले.

अन् दादासाहेबांनी ऑफर नाकारली

दादासाहेब फाळके यांनी 1993 मध्ये राजा हरिश्चंद्र हा सिनेमा तयार केला. अनेकांना एक गोष्ट माहीत नाही. ती म्हणजे राजा हरिश्चंद्र सिनेमा बनवल्यानंतर दादासाहेब फाळके यांना त्यांच्या एका इंग्रज मित्राने लंडनमध्ये सिनेमा बनवण्याची ऑफर दिली होती. पण दादासाहेबांनी ही ऑफर नाकारली. मला माझ्या देशातच भारतीय सिनेमाची पायाभरणी करायची आहे. माझ्या देशात फिल्म इंडस्ट्री उभारायची आहे, असं सांगून त्यांनी ही ऑफर नाकारली होती, असंही बरुण दास यांनी सांगितलं.

आम्ही लोकशिक्षण करतो

यावेळी त्यांनी जॉन लॉगी बेयर्ड या स्कॉटिश इंजिनीयरची कथा सांगितली. जॉन लॉगी बेयर्ड हे दूरदर्शनचे निर्माते होते. त्यांनी दूरदर्शनची पायाभरणी कशी केली. त्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं याची माहिती दिली. तसेच टीव्ही9 नेटवर्कचा हा दुसरा पुरस्कार सोहळा आहे. टीव्ही9 बांगलाने आधी एक पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. त्यानंतर टीव्ही9 मराठीने पहिल्यांदाच पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केल्याचंही त्यांनी सांगितलं. न्यूज क्षेत्रात आम्ही आघाडीवर आहोत. देशाती सर्वात मोठं न्यूज नेटवर्क हे टीव्ही9 आहे. आम्ही लोकांना माहिती देतो आणि त्यांचं लोकशिक्षणही करतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.