Bigg Boss 15 फेम तेजस्वी प्रकाशचं मराठीत पदार्पण; अभिनय बेर्डेसोबत करणार काम

हिंदी मालिकेतील लोकप्रिय चेहरा आणि बिग बॉस 15 ची विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) मराठी सिनेमातून पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. तिच्यासोबत मराठी सिनेमातील चॉकलेट बॉय अभिनय बेर्डे (Abhinay Berde) झळकणार आहे.

Bigg Boss 15 फेम तेजस्वी प्रकाशचं मराठीत पदार्पण; अभिनय बेर्डेसोबत करणार काम
Tejasswi Prakash and Abhinay BerdeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 9:55 AM

हिंदी मालिकेतील लोकप्रिय चेहरा आणि बिग बॉस 15 ची विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) मराठी सिनेमातून पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. तिच्यासोबत मराठी सिनेमातील चॉकलेट बॉय अभिनय बेर्डे (Abhinay Berde) झळकणार आहे. अभिनय आणि तेजस्वी ही फ्रेश जोडी असलेल्या ‘मन कस्तुरी रे’ या सिनेमाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये समुद्र किनारी स्कुटवरवर अभिनय आणि तेजस्वी यांचा रोमँटिक अंदाज दिसून येत आहे आणि त्यांचा हा लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. “जसा पोस्टरचा लूक फ्रेश आहे, तसाच फ्रेश लूक संपूर्ण सिनेमात पाहायला मिळणार आहे. हा एक युथफुल सिनेमा आहे”, असं दिग्दर्शक संकेत माने यांनी सांगितले आहे. संकेत माने यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला सिनेमा आहे. (Marathi Movie)

ती सध्या काय करते, अशी ही आशिकी आणि रम्पाटनंतर अभिनयच्या नव्या रोमँटिक सिनेमाची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. तर मराठमोळ्या तेजस्विनीने ‘संस्कार- धरोहर अपनों की’, ‘स्वरागिनी- जोडे रिश्तों के सूर’, ‘पहरेदार पिया की’, ‘सिलसिला बदलते रिश्तों का’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. बिग बॉस 15 मुळे तिला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. या शोमध्ये तिची आणि करण कुंद्राची जोडी विशेष चर्चेत राहिली. हे दोघं एकमेकांना डेट करत असून लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं जातंय. बिग बॉसचं विजेतेपद पटकावल्यानंतर तेजस्वी सध्या ‘नागिन’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारतेय.

पहा सिनेमाचा फर्स्ट लूक-

तेजस्वीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘मन कस्तुरी रे’ या सिनेमाचा पोस्टर शेअर केला आहे. यावर तिचा बॉयफ्रेंड करणने कमेंट करत सिनेमासाठी उत्सुक असल्याचं लिहिलं. लवकरच या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख समोर येईल. इमेन्स डायमेन्शन एंटरटेन्मेंट अॅन्ड आर्टस, वेंकट आर. अट्टिली आणि मृत्यूंजय किचंबरे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. प्रेमाची एक अनोखी कहाणी मांडणाऱ्या या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण मुंबईत झाले आहे.

हेही वाचा:

‘तुझ्या माझ्या संसाराला..’ मालिकेतील अमृता पवारने गुपचूप उरकला साखरपुडा

Rashmika Mandanna: आलिशान घर, महागड्या गाड्या.. अवघ्या 25व्या वर्षी रश्मिकाने कमावली इतकी संपत्ती

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...