“झुंडला ऑस्कर पुरस्कार मिळायला हवा”, सिनेमा पाहून हिंदीतील टॉप दिग्दर्शकांची प्रतिक्रिया

बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला झुंड हा चित्रपट उद्या रिलीज होतोय.या सिनेमाबद्दल सिनेरसिकांमध्ये उत्सुकता आहे

झुंडला ऑस्कर पुरस्कार मिळायला हवा, सिनेमा पाहून हिंदीतील टॉप दिग्दर्शकांची प्रतिक्रिया
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 7:34 PM

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांची मुख्य भूमिका असलेला ‘झुंड(Jhund) हा चित्रपट उद्या रिलीज (Jhund release 4 march) होणार आहे. याआधी हिंदीतील दिगदर्शकांसाठी या सिनेमाचं स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगनंतर या दिग्दर्शकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) “मी आतापर्यंत पाहिलेला सर्वाधिक चांगला झुंड हा सिनेमा आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांच्या रांगा लागतील”, असं म्हणालेत. तसंच दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांनी “प्रत्येक भारतीयाने हा सिनेमा बघायला पाहिजे”, असं म्हटलंय. “एका वेगळ्याच लेव्हलचा हा सिनेमा आहे”, असं संदीप वैद्य (Sandeep Vaidya) यांनी म्हटलंय.तर मिलोप झवेरी (Milop Zaveri) यांनी “झुंड हा मास्टर पीस असल्याचं म्हटलंय”. तर “भारताकडून हा सिनेमा ऑस्करसाठी नॉमिनेट झाला पाहिजे”, असं एका दिग्दर्शकाने म्हटलंय.

धनुषची प्रतिक्रिया

“कुठून सुरुवात करू ते समजत नाहीये. अप्रतिम चित्रपट बनवला आहे. नागराज मंजुळे यांचा आवाज चित्रपटांमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे, दुर्लक्ष करता येणार नाही असं त्याचं काम आहे. या चित्रपटातील तांत्रिक गोष्टींविषयी मी हजार शब्द बोलू शकतो, की हे अप्रतिम आहे, ते खूप छान आहे. पण अखेरीस या चित्रपटातील भावना तुमचं मन जिंकून जाते. हा अनुभव सर्वांनी घेण्यासारखा आहे. हा चित्रपट म्हणजे उत्कृष्ट नमुना आहे. हा चित्रपट पाहिल्याचा, ती जादू अनुभवल्या मला खूप आनंद आहे. या चित्रपटातील मुलांनी माझं मन जिंकलं आहे. मी नि:शब्द झालोय. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे,” असं धनुष म्हणाला.

सिनेमा गोष्ट

हा सिनेमा झोपडपट्टीत राहणारी मुलं आणि त्यांचे क्रीडा प्रशिक्षक यांच्यावर बेतलेला आहे. अमिताभ बच्चन हे क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे. सत्यकथेवर आधारित हा सिनेमा आहे. नागराज मंजुळे यांना या सिनेमाची कथा लिहिण्यासाठी दोन वर्षांचा वेळ लागला. या चित्रपटाची कथा लिहिताना अमिताभ बच्चन यांना डोळ्यासमोर ठेवून या सिनेमातील प्रशिक्षकाचं पात्र नागराज मंजुळे यांनी लिहिलं आणि आता स्वत: अमिताभ बच्चन यांनी साकारलेलं विजय बारसे हे पात्र घेऊन सिनेमा 4 मार्चला प्रदर्शित होतोय. हा सिनेमा विजय बारसे आणि त्यांचे शिष्य यांच्यावर आधारित आहे.

उद्या प्रदर्शित होणार

बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला झुंड हा चित्रपट उद्या रिलीज होतोय.या सिनेमाबद्दल सिनेरसिकांमध्ये उत्सुकता आहे त्यामुळे प्रदर्शनानंतर या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो पहावं लागेल.

संबंधित बातम्या

Bappi lahiri : बप्पी लाहिरी यांच्या अस्थींचं विसर्जन, नातेवाईकांना अश्रू अनावर

नेटकरी म्हणाले ‘तू तर उतावळी नवरी आणि गुडघ्याला बाशिंग’, मलायकाचं असं उत्तर, ट्रोलर दोनदा विचार करतील!

Jhund: ‘झुंड’च्या ट्रेलरमध्ये लक्ष वेधणारी ‘भावना भाभी’ आहे तरी कोण?

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.