Chandramukhi Box Office Collection: ‘बाण नजरंचा डायरेक्ट हाऊसफुल्लवर लागला की ओ’; ‘चंद्रमुखी’ची दणक्यात कमाई

'दर्दी रसिकांच्या पाठिंब्यामुळे अस्सल लोकसंगीताचा बाज असलेला चंद्रमुखी बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) सुपरहिट ठरतोय, धन्यवाद प्रेक्षकहो,' अशा शब्दांत अमृताने चाहत्यांचे आभार मानले. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच यातल्या गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.

Chandramukhi Box Office Collection: 'बाण नजरंचा डायरेक्ट हाऊसफुल्लवर लागला की ओ'; 'चंद्रमुखी'ची दणक्यात कमाई
Chandramukhi MovieImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 9:38 AM

प्रसाद ओकचं दिग्दर्शन, अजय-अतुलचं संगीत आणि कलाकारांचं दमदार अभिनय यांमुळे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi) या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. राज्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये याचे शोज हाऊसफुल आहेत. पहिल्या दोन दिवसांत या चित्रपटाने दणक्यात कमाई केली आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) कमाईचा आकडा सोशल मीडियावर शेअर केला आहे. पहिल्या दोन दिवसांत ‘चंद्रमुखी’ने 2.53 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘दर्दी रसिकांच्या पाठिंब्यामुळे अस्सल लोकसंगीताचा बाज असलेला चंद्रमुखी बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) सुपरहिट ठरतोय, धन्यवाद प्रेक्षकहो,’ अशा शब्दांत तिने चाहत्यांचे आभार मानले. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच यातल्या गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. सोशल मीडियावर या गाण्यांना तुफान प्रतिसाद मिळतोय.

प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, अशोक शिंदे, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अनेक कलाकार आहेत. 29 एप्रिल रोजी हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.

हे सुद्धा वाचा

अमृताची इन्स्टा पोस्ट-

एक ध्येयधुरंदर विवाहित राजकारणी जो समाजात काही सकारात्मक बदल आणू पाहात आहे. तो मोहमयी सौंदर्य, घायाळ करणाऱ्या अदा आणि बहारदार नृत्याने अनेकांना वेड लावणाऱ्या सौंदर्यवतीच्या म्हणजेच ‘चंद्रा’च्या प्रेमात पडतो. तेव्हा त्याच्या राजकीय कारकिर्दीवर होणारा परिणाम आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यात येणारी वादळे या चित्रपटातून पहायला मिळतात. चंद्रा, दौलतराव आणि दमयंती यांच्या प्रेमाचा त्रिकोण कथानकात विविधं वळणं आणतो. अमृताने चंद्राची भूमिका साकारण्यासाठी तिचं वजन वाढवलं आणि तेच वजन चित्रपटाकरता कायम ठेवण्यासाठीही तिने खूप मेहनत घेतल्याचं प्रसाद ओकने सांगितलं. भाषेवर तिने अभ्यास केला आहे. शिवाय अनेक काळ ती सोशल मीडियापासूनही लांब राहिली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.